Russian Plane Crash saam Tv
देश विदेश

Plane Crash: युक्रेनियन कैद्यांना घेऊन जाणारं रशियन लष्करी विमान कोसळलं, ६५ जण ठार

Russian Plane Crash : बुधवारी रशियाच्या बेलगोरोड भागात रशियाचे इल्युशिन आयएल -७६ लष्करी वाहतूक विमान कोसळले. या विमानात युक्रेनचे पकडलेले ६५ सैनिक होते, ज्यांना बेल्गोरोड प्रदेशात नेले जात होते.

Bharat Jadhav

Ukrainian Prisoners Russian Plane Crash :

युक्रेनियन युद्ध कैद्यांना (पीओडब्ल्यू) घेऊन जाणारे रशियन हेवी-लिफ्ट लष्करी विमान कोसळल्याची घटना घडली. बेल्गोरोड भागात हे विमान कोसळले असून यात ६५ कैद्यांचा मृत्यू झालाय. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रशियाच्या बेलगोरोड भागात रशियाचे इल्युशिन आयएल -७६ लष्करी वाहतूक विमान कोसळले. “या विमानात युक्रेनचे पकडलेले ६५ सैनिक होते, ज्यांना बेल्गोरोड प्रदेशात नेले जात होते. त्यात सहा क्रू मेंबर्स आणि तीन एस्कॉर्ट होते. (Latest News)

IL-७६विमान पायलटच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने आणि रहिवाशी क्षेत्राजवळ विमान कोसळलं. या दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, उंचावर विमान उडताना दिसत आहे, अचानकपणे विमान अनियंत्रित होते आणि जमिनीवर कोसळले. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, वाहतूक विमान ६५ युक्रेनी युद्धबंदी कैद्यांना घेऊन जात होते. आयएल ७६ हे लष्करी वाहतूक विमानाने सैनिकांना, कार्गो लष्कराचे साधनांची वाहतूक केली जाते.

यात साधरण दलाचे ५ जण असतात परंतु दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानात ९० प्रवाशी होते. दरम्यान मागील आठवड्यात युक्रेनियन क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांद्वारे इल्युशिन इल-७६ ला नियमितपणे लक्ष्य केले जात आहे. दरम्यान एका रशियन वृत्त वाहिनीने टेलीग्रामवर पोस्ट करत याची माहिती दिलीय. एक विमानाचा विस्फोट झाला आणि ते विमान जमिनीवर कोसळल्याचं या सांगितलं.

AFP ने मॉस्कोच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने सांगितलं की, मॉस्कोच्या वेळेनुसार सकाळी ११ वाजता (०८०० GMT), एक IL-७६ विमान नियमित उड्डाण करत असताना बेल्गोरोड प्रदेशात क्रॅश झालं. विमानात युक्रेनियन सैन्याचे ६५ सैनिक होते, ज्यांना देवाणघेवाणीसाठी बेलगोरोड प्रदेशात नेले जात होते. या कैद्यांसोबत सहा क्रू मेंबर्स आणि तीन एस्कॉर्ट्स होते.

विमान युद्धात कैद करण्यात आलेल्या युक्रेन सैनिकांना नेत होते, असा दावा रशियाने केलाय. तर एएफपीने यूक्रेनच्या स्थानिक माध्यमांचा हवाला देत सांगितलं की, त्यांच्या सैनिकांनी विमानाला लक्ष्य केलं. करण रशिया युद्ध कैद्यांऐवजी एस-३०० जमिनीवरून हवेत मारा करणारे एअर डिफेन्स सिस्टमचे क्षेपणास्त्र पाठवले जात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT