Russian Oil Ship In India Saam Digital
देश विदेश

Russian Oil Ship In India: रशियाचं तेलाने भरलेलं जहाज भारताच्या किनाऱ्यावर का भटकतंय? भारताने का दिली नाही परवानगी? जाणून घ्या

Russian Oil Ship In India: रशियन तेलावर पाश्चात्य देशांनी प्रति बॅरल ६० डॉलरची घातलेली मर्यादा कुचकामी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह जी ७ देशांनी अलीकडेच कडक निर्बंध केले आहेत. त्यामुळे तेलाने भरलेलं रशियन जहाज भारताच्या किनारपट्टीजवळ भटकत आहे.

Sandeep Gawade

Russian Oil Ship In India

रशियन तेलावर पाश्चात्य देशांनी प्रति बॅरल ६० डॉलरची घातलेली मर्यादा कुचकामी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह जी ७ देशांनी अलीकडेच कडक निर्बंध केले आहेत. त्यामुळे तेलाने भरलेलं रशियन जहाज भारताच्या किनारपट्टीजवळ भटकत आहे. जगातील सर्वाधिक जहाजे असलेला देश ग्रीसकडूनही रशियाला मोठा झटका देण्यात आला आहे.

रशियाच्या तेलावर अमेरिकेचे निर्बंध दिवसेंदिवस वाढत आहेत. अलीकडेच ब्लूमबर्ग ने एक रिपोर्ट सादर केला होता. या रिपोर्टमध्ये, अमेरिकेने घातलेल्या निर्बंधामुळे भारताने आपल्या बंदरांमध्ये रशियाच्या तेलाच्या जहाजाला उतरण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. ग्रीसमधूनही अशाच प्रकारची माहिती समोर आली आहे. या जहाजांचा वापर रशियाच्या तेलाच्या निर्यातीसाठी होऊ अशी सक्त ताकीद जगातील सर्वाधिक जहाज असलेल्या ग्रीसला अमेरिकेने दिली आहे. त्यानंतर ग्रीसची जहाजं रशियापासून थोडी लांबच आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमेरिकेने ताकीद दिल्यानंतर ग्रीसच्या तेल जहजांमध्ये २५ टक्के घट होईल, असा अंदाज ब्लूमबर्गने आपल्या रिपोर्ट मध्ये म्हटलं आहे. ऑक्टोबर पर्यंत ग्रीसची २० जहाजं रशियाच्या तेलाची वाहतूक करत होती. आता त्यांची संख्या १५ वर आली आहे. तर सहा महिन्यापूर्वी ५० जहाच या कामात गुंतली होती. त्यामध्ये ६० टक्के घट झाली आहे.

कच्च्या तेलाने भरलेलं रशियाचं एक जहाज भारताच्या किनाऱ्यावर भरकटत आहे. गुजरातच्या वाडिनार बंदराच्या आसपास असलेल्या या जहाजाला अद्याप भारत करकारने परवानगी दिलेली नाही, असं या अहवालात म्हटलं आहे. हे जहाज १६०० सागरी मैलावर भटकत आहे. रशियाचं हे जहाज दक्षिण कोरियाच्या बाजूने निघालं होतं आणि भारतात उतरणार होतं. मात्र मागच्या १० दिवसांपासून हे जहाज समुद्रातच भरकटत आहे. अमेरिकेने प्रतिबंध घातलेल्या पाज जहाजांमध्ये या जहाजाचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याने गाठला नवा उच्चांक! १ तोळा सोनं १ लाख ३२ हजारांवर; सुवर्णनगरीतील आजचे दर किती?

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT