Massive Russian missile strike leaves Ukraine’s Zaporizhzhia and Dnipro in darkness, with heavy civilian casualties and widespread destruction. Saam Tv
देश विदेश

Russia-Ukraine Tension: रशिया युक्रेन युद्ध पुन्हा सुरु, रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला

Russia-Ukraine Conflict Intensifies: रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याऐवजी पुन्हा युद्धाचा भडका उडतोय... रशियानं युक्रेनवर मोठा हल्ला केलाय... रशिय़ा युक्रेन तणाव आता कसा वाढलाय?

Suprim Maskar

रशिया युक्रेन संघर्षाला पुन्हा एकदा सुरुवात झालीय. युक्रेनी हल्ल्याचा डाव उधळून लावल्यानंतर आता रशियानं युक्रेनच्या 14 ठिकाणांवर 500 हून अधिक ड्रोन आणि 45 क्षेपणास्त्र डागलेत..या हल्ल्यात रशियानं युक्रेनची क्षेपणास्त्र प्रणाली भेदलीय.

रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या जैपसोरिजिया, लुत्सक आणि डिनिप्रो या शहराचं सर्वाधिक नुकसान झाले आहे. जैपसोरिजियामध्ये 2500 घरांची वीजपुरवठा बंद झालाय. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक जण जखमी झालेत...

दरम्यान युक्रेनियन सैन्यानेही रशियाच्या ताब्यातील ठिकाणांवर हल्ला केल्याचा दावा केलाय. युक्रेनियन लष्करी गुप्तचर यंत्रणेनुसार, युक्रेनने क्रास्नोडार आणि सिझरानमधील रशियाच्या ऑयल रिफाइनरीवर ड्रोन हल्ल्याची माहिती देण्यात आलीय.युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी म्हणाले की,

रशियाविरोधात केवळ निवेदनांनी काम चालणार नाही, तर बँकींग आणि ऊर्जा क्षेत्रावर कठोर निर्बंध लावावे लागतील.

रशिया युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर प्रयत्न सुरु असताना पुन्हा रशिया युक्रेन यांच्यात युद्ध पेटल्यानं आता शांतातेच्या चर्चेंचे प्रयत्न निष्फळ ठरलेत.. आता या युद्धामुळे तिथली सर्वसामान्य जनता होरपळ असल्यानं युद्धानं अनेकांची चिंता वाढवलीय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT