PM Narendra Modi on Russia Ukraine War  Saam TV
देश विदेश

Breaking News: PM मोदींच्या हस्तक्षेपामुळे रशिया-युक्रेनमधील अणुयुद्ध टळलं; अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावा

Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने रशिया आणि युक्रेनमधील अणुयुद्धाचा धोका टळला, असा दावा अमेरिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका अहवालातून केला आहे.

Satish Daud

PM Narendra Modi on Russia Ukraine War

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने रशिया आणि युक्रेनमधील अणुयुद्धाचा धोका टळला, असा दावा अमेरिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका अहवालातून केला आहे. जगावरील एक मोठी आपत्ती रोखण्यात पंतप्रधान मोदी यांची मोठी भूमिका आहे, असंही त्यांनी आपल्या दाव्यात म्हटलं आहे. सीएनएनने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये दोन्ही देशांमधील संघर्ष अचानक उफाळून आला यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले देखील करण्यात आले. या हल्ल्यात शेकडो लोकांचा जीव गेला.(Latest Marathi News)

दोन बलाढ्य देशामधील हे युद्ध आण्विक संघर्षाकडे जात असल्याच्या अनेक बातम्याही समोर आल्या होत्या. त्यामुळे भारतासह इतर देशांनी मध्यस्थी करत रशिया-युक्रेनला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, रशियाने आपल्या आणि युक्रेनमध्ये मध्यस्थी करणाऱ्या देशांना कडक शब्दात इशारा दिला होता.

इतकंच नाही, तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आण्विक हल्ला करण्याची धमकी देखील दिली होती. अशातच जगातील मोठ्या नेत्यांनी रशिया-युक्रेन संघर्ष रोखण्यास उल्लेखनीय भूमिका बजावली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे नाव आघाडीवर होते, असा दावा अमेरिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला.

सीएनएनने रविवारी (ता. ११) हा दावा एका वृत्तात प्रसिद्ध केला. त्यानुसार, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनवर आण्विक हल्ला करण्यापासून रोखले. मोदींनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे जगावरील अणुयुद्धाचा धोका टळला, असा दावा अमेरिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT