Russia allegedly provides special intelligence support to Iran amid escalating tensions with the United States and Israel Saam Tv
देश विदेश

रशियाचा इराणला पाठिंबा, युद्धाचा भडका उडणार, रशियाचं 'स्पेशल इंटेलिजन्स' इराणच्या मदतीला?

Russia-Iran Strategic Alliance: इराण आणि अमेरिका-इस्राइलमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असताना रशियानं अमेरिकेविरोधात युद्धात उडी घेतलीय... रशियानं इराणच्या मदतीसाठी स्पेशल इंटेलिजन्सचा कसा वापर केलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

अमेरिका-इराण युद्धात आता जगातील सर्वात मोठी लष्करी ताकद असलेल्या रशियानं उडी घेतलीय...आतापर्यंत शांत असलेला रशिया जाहीरपणे इराणच्या पाठीशी उभा राहिल्यानं पाश्चात्य देशांत मोठी खळबळ उडाली. रशियाने अमेरिकेला शह देण्यासाठी इराणला 'स्पेशल इंटेलिजन्स' पुरवल्याचा दावा ही द वाशिंगटन पोस्टनं तीन सैनिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं केलायं....

रशियाचे 'स्पेशल इंटेलिजन्स' इराणच्या मदतीला दाखल झालयं.....ज्यामुळे इराणला अमेरिकन सैन्यावर हल्ला करण्यास मदत होईल...रशियाकडून इराणला अमेरिकन युद्धनौका, लढाऊ विमानं आणि गुप्त कारवायांच्या ठिकाणांची माहिती देण्यात आलीय...रशिया हाय-टेक उपग्रहांचा वापर करून इराणला रिअल-टाइम डेटा पुरवतोय... कुवैतमधील अमेरिकन लष्करी तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात रशियन गुप्तचर यंत्रणेचा इराणला फायदा झाला...

दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन इराणी राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी संवाद साधलाय...रशियन वृत्तवाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार, पुतीन यांनी इराणला पाठिंबा दिला असून आम्ही इराणच्या सोबत आहोत, असं म्हटलयं...मात्र रशिया इराणला युद्धात का मदत करतोय... पाहूयात...

युक्रेन युद्धात इराणनं रशियाला मदत केली होती, आता त्याची परतफेड म्हणून रशिया इराणची लष्करी शक्ती वाढवण्यासाठी मैदानात उतरलाय... युक्रेनविरुद्धच्या युद्धात क्षेपणास्त्रे आणि ड्रोनची गरज असल्यानं रशियाने इराणशी आपले संबंध मजबूत केलेत. अशात अणुकार्यक्रम आणि हिजबुल्लाह, हमास यांसारख्या प्रॉक्सी गटांना पाठिंबा दिल्यामुळे इराण वर्षानुवर्षे एकाकी पडलाय.. त्यामुळे रशियाचा पाठिंबा इराणसाठी महत्त्वाचा मानला जातोय...

दरम्यान रशियानं अमेरिकेसंदर्भातील गुप्त माहिती इराणला दिल्यानंतर अमेरिकेनंही निवेदन जारी केलयं...याचा इराणमधील लष्करी कारवायांवर परिणाम होणार नाही... इराणविरोधातील लष्करी कारवाया अशाच सुरु राहितील, असं अमेरिकेनं म्हटलयं... त्यामुळे रशिया-इराणच्या या नव्या समीकरणामुळे जागतिक राजकारणाची सर्व गणितं बदललेत.. आता हे युद्ध थांबणार की अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचणार? हे येणारा काळच ठरवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कल्याण मुरबाड रोड सिंडीकेट परिसरात आतिष खान कंपाउंड पारवाणी चाळीत बाईक चोरी

Maharashtra Politics: नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंनी डाव साधला, भाजपसह राष्ट्रवादी चीतपट; बड्या नेत्याचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

आजची रात्र, आखाती युद्धातील काळरात्र ? जगाला हादरा बसणार?

Sunday Horoscope : रविवार जाणार आनंदात, नवीन संधीमुळे उजळणार भाग्य; वाचा रविवारचे खास राशीभविष्य

PM Modi: 'मी आहे तोपर्यंत मोदी सत्तेत', केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्यानं राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT