रशियन महिलांनी किमान आठ मुले जन्माला घालावीत, असे आवाहन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केलं. वर्ल्ड रशियन पीपल्स कौन्सिलमध्ये संबोधित करताना पुतीन बोलत होते. रशियन महिलांनी जास्तीत जास्त मुलांना जन्माला घालावे आणि मोठ्या कुटुंबाला 'आदर्श' बनवावे, असे ते म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रशियाच्या महिलांना सात ते आठ मुलांना जन्माला घालावे असे आवाहन करतानाच यात काही नवीन नाही. जुन्या काळात असंच होत होतं, असं व्लादिमीर पुतीन म्हणाले. आमच्या आजी किंवा पणजींना सात-आठ मुले किंवा त्यापेक्षा अधिक असायची. महिलांनी आपल्या परंपरा जपल्या पाहिजेत, तसेच त्या पुनर्जिवीत करायला हव्यात, असे ते म्हणाले. युक्रेन युद्धात मोठ्या संख्येने रशियन सैनिक मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे पुतीन असे म्हणाले असावेत, असे तेथील प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी मॉस्को येथील वर्ल्ड रशियन पीपल्स कौन्सिलमध्ये उपस्थितांना संबोधित केले. मोठे कुटुंब हे रशियातील सर्व लोकांसाठी आदर्श जीवन जगण्याची पद्धती ठरायला हवी. कुटुंब केवळ राज्य आणि समाजाचा पाया नाही, तर एक नैतिकतेचा स्त्रोत आहे. रशियात अनेक दशकांपासून जन्मदरात घट होत आहे. या कारणास्तव तरुणांच्या संख्येत मोठी घट झालेली आहे, असे ते म्हणाले.
युक्रेनसोबत दीड वर्षापासून युद्ध सुरू आहे. त्यात लाखो रशियन सैनिक मारले गेले आहेत. पुतीन म्हणाले की, येणाऱ्या दशकांत आणि इतकंच नाही तर पुढील पिढ्यांसाठी रशियाची लोकसंख्या संरक्षित करणे आणि ती वाढवणे हेच आपले लक्ष्य आहे. हेच हजारो वर्षे जुन्या आणि शाश्वत रशियाचे भविष्य आहे.
९ लाख नागरिकांनी देश सोडला
युक्रेनसोबतच्या युद्धामुळे अंदाजे नऊ लाख नागरिकांनी देश सोडला आहे. पुतीन यांनी तीन लाखांचे राखीव दल सज्ज ठेवण्याची घोषणा केल्यानंतर देश सोडून जाण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युक्रेनसोबतच्या युद्धात ५० हजार सैन्य मारले गेले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.