Crude Oil Saam Tv
देश विदेश

पेट्रोल-डिझेलच्या दरापासून मिळणार दिलासा? रशियाची भारताला कच्च्या तेलाच्या किमतीवर ऑफर!

भारत लवकरच रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करणार आहे. रशियाने भारताला कच्चे तेल स्वस्तात विकण्याची ऑफर दिली आहे.

वृत्तसंस्था

Russian Crude Oil: भारत लवकरच रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करणार आहे. रशियाने भारताला कच्चे तेल स्वस्तात विकण्याची ऑफर दिली आहे. रशियाने सध्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतींच्या तुलनेत प्रति बॅरल $ 35 च्या सवलतीने कच्चे तेल विकण्याची ऑफर दिली आहे. रशियाच्या या ऑफरवर मोदी सरकार सध्या (Modi Government) गांभीर्याने विचार करत आहे अशी माहिती आहे. रशियाने भारताला कच्च्या तेलाची विक्री करताना शिपिंग आणि विमा खर्चाची जबाबदारी घेण्याचीही तयारी दर्शवली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील दराच्या तुलनेत कच्च्या तेलाची विक्री करण्यास रशिया भारताला $35 प्रति डॉलरच्या सवलतीने देण्यास तयार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज वाढत असलेल्या किमतींनी खिसा कापत असलेल्या भारतातील ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.

यापूर्वी पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी (Hardeep Singh Puri) यांनीही काही दिवसांपूर्वी संसदेत सांगितले होते की, भारत रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी करण्याचा विचार करत आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या दरामुळे त्रस्त झालेल्या भारताला रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदी केल्यास त्याचा मोठा फायदा होणार आहे. तर सध्या, केंद्र सरकार रशियाला कच्चे तेल खरेदी करण्यासाठी कोणत्या पद्धतीने पैसे देणार किंवा याची पद्धत काय असणार आहे याचा विचार करत आहे. रुपया-रुबल प्रणाली (rupee-ruble system) हा एक पर्याय आहे, परंतु याबाबद्दल अंतिम निर्णय लवकरच घेतला जाण्याची याची अपेक्षा आहे.

हे देखील पहा-

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण;

रशिया आणि युक्रेन यांच्याततील युद्ध संपुष्टात येण्याची शक्यता आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. कच्चे तेल 5 डॉलरच्या दररांसोबत 108 डॉलर प्रति बॅरलवर सध्या ट्रेड करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT