Jammu Kashmir Assembly Ruckus over article 370 saam tv
देश विदेश

Article 370 : धक्काबुक्की, रेटारेटी अन् नुसता राडा; कलम ३७० वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गोंधळ, VIDEO

Jammu Kashmir Assembly Ruckus : जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० वरून पुन्हा तुफान राडा झाला. सभागृहात गुरुवारी जोरदार गोंधळ झाला.

Nandkumar Joshi

Jammu Kashmir Assembly Election: कलम ३७० वरून जम्मू - काश्मीर विधानसभेत आज, गुरुवारी पुन्हा तुफान राडा झाला. विधानसभा सभागृहात घोषणा, धक्काबुक्की आणि घोषणा, गोंधळ असा दुसरा अंक बघायला मिळाला. विशेष म्हणजे आदल्या दिवशीच विशेष दर्जा देण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यावेळीही सभागृहात जोरदार गदारोळ झाला होता. भारतीय जनता पक्षाने त्याचा कडाडून विरोध केला होता.

बारामुल्लाचे खासदार इंजिनीअर राशिदचे बंधू खुर्शीद अहमद शेख हे सभागृहात कलम ३७० चा उल्लेख असलेला बॅनर घेऊन पोहोचले. त्यानंतर हा गदारोळ सुरू झाला. रिपोर्टनुसार, गदारोळात काही सदस्यांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकारही घडला. भाजप नेते सुनील शर्मा यांनी बॅनर दाखवल्यावर आक्षेप नोंदवला होता.

पहिल्या दिवसापासूनच राडा

जम्मू काश्मीर विधानसभेच्या ५ दिवसांच्या अधिवेशनाची सुरुवातच गदारोळानं झाली. पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या आमदार वाहिद पारा यांनी कलम ३७० हटवल्याच्या विरोधात प्रस्ताव सादर केला होता. तसेच त्यांनी विशेष दर्जा बहाल करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर बुधवारी सभागृहाने प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि त्याला विरोधकांनी आक्षेप घेत जोरदार गोंधळ घातला.

मेहबुबा मुफ्ती यांनी केला होता आरोप

पीडीपी अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी बुधवारी विधानसभेत टीका केली होती. नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याला विशेष दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचं उचललेलं पाऊल मनापासून नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. आमचा पक्ष जम्मू काश्मीरमध्ये ऑगस्ट २०१९ मधील परिस्थिती पुन्हा आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही त्यांनी सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT