RSS chief Mohan Bhagwat addresses volunteers during the organization’s centenary programme. saam tv
देश विदेश

SC, ST स्वयंसेवक RSSचा सरसंघचालक होणार? काय म्हणाले संघ प्रमुख मोहन भागवत

SC-ST Volunteer Become RSS Chief: आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी सरसंघचालकाच्या नियुक्तीबाबत मोठं विधान केलंय. कोणताही स्वयंसेवक, मग तो कोणत्याही जातीचा असो किंवा अनुसूचित जातीचा असो, सरसंघचालक होऊ शकतो. त्यासाठी कोणतीही औपचारिक निवडणूक प्रक्रिया नसते, असं भागवत म्हणालेत.

Bharat Jadhav

  • संघ प्रमुख निवडीसाठी कोणतीही निवडणूक प्रक्रिया नसल्याचे स्पष्टीकरण

  • कोणत्याही जातीतील स्वयंसेवक सरसंघचालक होऊ शकतो

  • एससी, एसटी स्वयंसेवकांनाही संधी असल्याचे मोहन भागवत यांचे वक्तव्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखाची वयोमर्यादा किती असावी? प्रमुखपदावर कोण बसू शकतो? एस, एसटी किंवा क्षेत्रिय व्यक्ती सरसंघचालक होऊ शकतो का? अशा प्रश्नांची उत्तरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी संघाच्या शताब्दी कार्यक्रमात दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी बोलताना मोहन भागवत म्हणाले, संघाचा प्रमुख निवडण्यासाठी कोणत्याही प्रकारची निवडणूक होत नाही, मात्र कोणत्याही जातीमधील स्वयंसेवक हा सरसंघचालक होऊ शकतो.

संघाच्या शताब्दी कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, ७५ वर्ष वय झालंतर सरसंघचालक पदावरून पायउतार झालं पाहिजे. माझेही वय ७५ वर्ष झाले आहे, मी याची कल्पना संघाच्या कार्यकर्त्यांना आणि संघाच्या इतर प्रमुखांना दिली, मात्र त्यांनी मला पायउतार होण्यापासून रोखलं. वयाच्या ७५ व्या वर्षी पोहोचल्यानंतर संघाला मोहन भागवत यांनी प्रकृतीची माहिती दिली.

पण संघाने त्यांना त्यांचे काम सुरू ठेवण्यास सांगितल्याचं भागवत म्हणाले. "सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की ७५ वर्षांनंतर, कोणत्याही पदाशिवाय काम करावे. माझे वय ७५ वर्षांपर्यंत पोहोचलो आहे. आरएसएसला त्याची माहिती दिली, परंतु संघाने मला काम करत राहण्यास सांगितल्याचे ते म्हणाले.

यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी ठामपणे सांगितले की, "जेव्हा कधीही संघ त्यांना पद सोडण्यास सांगेल तेव्हा ते लगेच पद सोडतील." गेल्या काही दिवसांपासून संघाचा पुढचा प्रमुख कोण असेल याबद्दल वादविवाद सुरू आहेत. यावरही त्यांनी भाष्य केलं. भागवत म्हणाले की, संघ प्रमुखपदासाठी कोणतीही निवडणूक होत नाही. प्रादेशिक आणि प्रांतीय प्रमुख संयुक्तपणे सरसंघचालकांची नियुक्ती करतात.

जो हिंदू तोच बनेल सरसंघचालक - मोहन भागवत

व्यक्तीनं ७५ वर्षानंतर कोणत्याही पदाशिवाय काम केलं पाहिजे. जर संघाच्या प्रमुखांनी परवानगी दिली तर पदा राहावे, पण परवानगी नसेल तर पदाशिवाय काम केलं पाहिजे. माझ्याबाबतही झालं की, मी जेव्हा ७५ व्य झाल्याचं सांगितलं तेव्हा संघाने मला काम सुरू ठेवण्यास सांगितलं. पदावर राहणं आणि न राहणं हे माझ्यावर किंवा पदावरील व्यक्तीचा निर्णय नसतो. तो संघाचा निर्णय असतो. सरसंघचालकाच्या नियुक्ती बाबत मोहन भागवत म्हणाले की, जो व्यक्ती त्या पदावर असतो, तो व्यक्ती पुढचा सरसंघचालक कोण बनेल त्याची नियुक्ती करतो. त्याच्यावर इतर लोक श्रद्धा ठेवतात. त्या नियुक्तीसाठी निवडणूक होत नाही. संघाचा सरसंघचालक ब्राह्मणच बनेल असं नाहीये. कोणी क्षेत्रिय , शुद्रही बनू शकत नाही. पण जो हिंदू आहे तोच या पदावर विराजमान होतो. म्हणजेच काय तर कोणत्याही जातीमधील स्वंयसेवक असला तरी तो संघाचा सरसंचालक बनत असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi : दिल्लीतील दिग्गज नेत्यासह ६ जणांना अटक; माजी CEO आणि IAS अधिकाऱ्याचाही समावेश, एसीबीची सर्वात मोठी कारवाई

Kumbh Mela Tender Scam: जळगावात कुंभमेळा बोगस टेंडरचा छापखाना; बिंग कसं फुटलं? घोटाळ्याची इनसाईड स्टोरी

Manoj Jarange: मुंबईत पुन्हा आरक्षणावरून संघर्ष; आंदोलनासाठी मनोज जरागेंचं पोलिसांना पत्र

परीक्षा कक्षात ३० मिनिटे अगोदर उपस्थित राहणं अनिवार्य; मुंबई विद्यापीठाचा महत्वपूर्ण निर्णय, २०२६-२७ पासून सर्व परीक्षांना नियम लागू

snakebite disease : सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित, सरकारी-खासगी रुग्णालयांना मृत्यूची नोंद बंधनकारक

SCROLL FOR NEXT