PM Modi, Rozgar Mela/Twitter SAAM TV
देश विदेश

Rojgar Mela : देशातील ५१००० तरुणांना मिळणार नोकरी, PM मोदी आज अपॉइंटमेंट लेटर देणार

JOB Alert : देशभरात 46 ठिकाणी रोजगार मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रविण वाकचौरे

PM Modi News :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये 51,000 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रे (ऑफर लेटर) देतील. पंतप्रधान कार्यालयाने सोमवारी सांगितले की, पंतप्रधान नरेद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही नियुक्ती पत्रे वितरित करतील आणि उमेदवारांना संबोधित देखील करतील. देशभरात 46 ठिकाणी रोजगार मेळावा होणार आहे.

राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोस्ट विभाग, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, मंत्रालय यासह विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये हे तरुण काम करतील. (Latest Marathi News)

नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांना iGOT कर्मयोगी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन मॉड्यूल, कर्मयोगी प्रारंभद्वारे त्यांचे कौशल्य वाढवण्याची संधी मिळणार आहे. कोणत्याही डिव्हाइसवरून आणि कोणत्याही ठिकाणाहून शिक्षण घेता येईल, असे 680 हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम या मोड्यूलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

देशभरात 46 ठिकाणी रोजगार मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत नवनियुक्त उमेदवारांना केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश समर्थित उपक्रमात सामावून घेतले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News: मुंख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, कॅबिनेट मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pune : पुण्यातील भयंकर घटना! सिलिंडर बदलताना अचानक ब्लास्ट, एकाचा होरपळून मृत्यू; नेमकं काय घडलं?

Shivrajyabhishek 2026: राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर जाताय? मुंबई-पुण्याहून कसे पोहोचाल, किती येईल खर्च? जाणून घ्या एका क्लिकवर

T20 Mumbai League: श्रेयस अय्यर-आदित्य तारेची तुफानी सुरुवात, फाल्कन्सने रॉयल्सवर थरारक विजय मिळवत उघडलं खातं

SCROLL FOR NEXT