अभिलाष पटेल, साम टीव्ही
काम कुणाला चुकलंय? कुणी काम आनंदाने करतो, तर कुणी तणावाखाली. आपल्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणाचाही त्यावर प्रभाव पडतोच. अनेक जणांनी कामाच्या तणावाखाली आत्महत्या केल्याच्या बातम्या आपण पाहतो. पण कामाच्या ताणामुळे चक्क रोबोटनेच आत्महत्या केल्याचे जगातील हे पहिलंच वृत्त समोर आलं (Robot End Life) आहे.
रजनीकांतच्या रोबोट सिनेमात आपण रोबोटला सगळी कामे करताना पाहिले आहे. अगदी राग-रुसव्यापासून ते नायिकेच्या प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास आपण सिनेमात पाहिलाय. पण रील नव्हे तर रिअल लाईफमध्ये रोबोटने आत्महत्या केल्याची ही घटना दक्षिण कोरियात घडली (South Korea) आहे. एका नगरपालिकेने याबाबत माहिती दिल्याची बातमी डेली मिररने दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचे नगरपालिकेने सांगितले आहे.
हा रोबोट गुमी नगरपालिकेची सगळी कामे अगदी नित्यनेमाने करायचा. एक दिवस तो जिन्याजवळ येऊन निष्क्रिय अवस्थेत येऊन खाली पडला, असे कर्मचाऱ्यांनी (Robot) सांगितले. त्याआधी तो गोंधळलेल्या अवस्थेत इकडे तिकडे फिरत होता, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. हा रोबोट अतिकामामुळे तणावात होता असे सांगितले जात आहे.
या घटनेचा तपास आता या रोबोटची निर्मिती केलेली कंपनी करणार आहे. कॅलिफोर्नियास्थित बियर रोबोटिक्स या कंपनीने या रोबोटची निर्मिती केली होती. घटनेच्या तपासासाठी आता रोबोटच्या सर्व पार्टची(Work Load) तपासणी करुन अभ्यास केला जाणार आहे. ऑफिसेसच्या कामांसाठी जगात सर्वाधिक रोबोट हे दक्षिण कोरियात वापरले जातात. प्रत्येक 10 कर्मचाऱ्यांच्या मागे सरासरी 1 रोबोट असल्याचीही माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.