Lalu Prasad Yavdav on Rahul Gandhi Saam Tv
देश विदेश

Lalu Prasad Yavdav on Rahul Gandhi: “अजूनही वेळ गेली नाही, लग्न करून टाका”; लालू प्रसाद यादव यांचा राहुल गांधींना मिश्किल सल्ला

Marathi Political News: लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधींना लग्न करण्याचा मिश्किल सल्ला दिला आहे.

Shivani Tichkule

Lalu Prasad Yavdav on Rahul Gandhi Marriage: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात एकजूट करण्यात गुंतलेल्या विरोधी पक्षांची शुक्रवारी (२३ जून) पाटणा येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. 

त्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.  बैठकीनंतर विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन 2024 ची निवडणूक एकत्र लढवणार असल्याचा पुनरुच्चार केला.

या बैठकीवरून भाजपाने टीकास्र सोडलं होत. २०२४ साठी नितीश कुमार यांनी पाटणामध्ये वऱ्हाडींना बोलावलं आहे. पण वऱ्हाडींमध्ये नवरदेवही असतो. २०२४ साठी तुमचा नवरदेव (पंतप्रधान पदाचा उमेदवार या अर्थाने) कोण आहे? असा सवाल भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी विचारला आहे.

तर रवीशंकर प्रसाद यांच्या या टीकेला लालू प्रसाद यादव यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिल आहे. लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधींना लग्न करण्याचा मिश्किल सल्ला दिला आहे. यावेळी नितीश कुमार यांनी राहुल गांधींनी लांब दाढी वाढवल्याचं निदर्शनास आणून दिलं.

यानंतर लालू प्रसाद म्हणाले की, “ राहुल गांधींना आता दाढी ट्रिम करावी लागणार आहे कारण आता लग्न करण्याची वेळ आली आहे. तुम्ही आमच्या सल्ल्याकडे लक्ष दिलं नाही. आतापर्यंत तुमचं लग्न व्हायला हवं होतं. अजूनही वेळ गेली नाही लग्न करून टाका असा मिश्किल सल्ला लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधींना दिला.

यावर राहुल गांधी म्हणाले, तुमच्या सल्ल्याचा विचार करून मी लग्न करेन. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधींच्या टी-शर्टचं कौतुकही केलं आहे. मोदी कुर्ता गुंडाळण्यासाठी तुमचा टी-शर्ट एकदम योग्य आहे, असं देखील लालू प्रसाद यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT