Plan Crash  Saamtv
देश विदेश

Madhya Pradesh: मंदिराच्या कळसाला विमानाची धडक, भीषण अपघातात पायलटचा जागीच मृत्यू

मंदिराच्या कळसाला प्रशिक्षणार्थी विमान धडकल्याने वरिष्ठ पायलटचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात ट्रेनीही गंभीर जखमी झाला आहे. अपघातातील जखमींना गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Gangappa Pujari

Madhya Pradesh: मध्यप्रदेशमधून एक दुर्देवी बातमी समोर येत असून, मंदिराच्या कळसाला प्रशिक्षणार्थी विमान धडकल्याने वरिष्ठ पायलटचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात ट्रेनीही गंभीर जखमी झाला आहे. अपघातातील जखमींना गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.(Madhya Pradesh)

मिळालेल्या माहितीनुसार, चोरहटा विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतले होते.. मात्र, दाट धुक्यांमुळे विमान खालीच राहिलं. ते अधिक उंचावर उडू शकलं नाही. यावेळी या विमानाने आधी एका आंब्याच्या झाडाला धडक दिली. त्यानंतर हे विमान मंदिराच्या कळसाला जाऊन धडकल्यामुळे हा अपघात झाला. ही धडक एवढी भीषण होती की मंदिराचा कळस मोडून पडला, तसेच विमानाचे पातेही तुटले.

हे विमान गावातील घरांवर कोसळले असते तर मोठी जिवीतहानी झाली असती. विमान कोसळल्याच्या बातमीनंतर गावकऱ्यांनीही या ठिकाणी गर्दी केली. या प्रकरणात आता पोलिस अधिक चौकशी करत आहेत. अपघातात सीनियर पायलटचा मृत्यू झाला. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तसेच दोन जणांना संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील प्रशिक्षणार्थी पायलटची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. (Plane Crash)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT