आता Reliance Jio चं नेटवर्कही डाऊन! ट्विटरवर #jiodown ट्रेंडिंग Saam Tv
देश विदेश

आता Reliance Jio चं नेटवर्कही डाऊन! ट्विटरवर #jiodown ट्रेंडिंग

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओच्या वापरकर्त्यांना आज खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वृत्तसंस्था

Reliance Jio Network Down: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओच्या वापरकर्त्यांना आज खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. ट्विटरवर काही मिनिटांतच #jiodown ट्रेंड करण्यास सुरुवात झाली आहे. युजर्सनी जिओचे नेटवर्क बंद असल्याची तक्रार युजर्स करत आहेत आहे. काही जिओ यूजर्स लिहीत आहेत की, Jio चे नेटवर्क कित्येक तास काम करत नाही आहे. काही वापरकर्त्यांनी लिहिले की फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम नंतर आता जिओचे नेटवर्कही बंद झाले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संपूर्ण देशात जिओची सेवा खंडित झालेली नाही. जिओ सेवा फक्त मध्य प्रदेशातील काही भागात बंद झाली आहे. गेल्या दीड तासापासून ही समस्या सुरू आहे. कंपनीची technical Team त्याचे निराकरण करण्यासाठी कार्यरत आहे. लवकरच सेवा पुन्हा सुरळीत होईल असे सांगण्यात येत आहे.

देशाच्या विविध भागांतील जिओ ग्राहक Jio नेटवर्कमधील युजर्स तक्रार करत आहेत. जिओकेअर हँडल प्रामुख्याने नेटवर्क समस्या असलेल्या लोकांना एक सामान्य असा प्रतिसाद देत आहे, "तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद वाटतो. तुम्हाला इंटरनेट सेवा वापरण्यात आणि कॉल/एसएमएस करण्यात किंवा कॉल/एसएमएस प्राप्त करण्यात समस्या येऊ शकते. ही समस्या तात्पुरती आहे आणि आमची टीम आहे शक्य तितक्या लवकर त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे".

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijaya Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठीत, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Raj thackeray: आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको, राज ठाकरे कडाडले

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

SCROLL FOR NEXT