Crime News Saam tv
देश विदेश

Crime News: समलैंगिक मित्रानेच पार्टनरची केली हत्या, दोघात तिसरा आल्यानं आयुष्याचा खेळ संपवला

Crime News: समलैंगिक मित्राने त्याच्या पार्टनरची निर्घृण हत्या केली आहे. आपला पार्टनर दुसर्‍या पार्टनरसोबत संबध ठेवत असल्याच्या संशयातून, त्यानं पार्टनरची हत्या केल्याची माहिती आहे.

Bhagyashree Kamble

उत्तरप्रदेशच्या बरेलीमध्ये समलैंगिक मित्राने त्याच्या पार्टनरची निर्घृण हत्या केली आहे. आपला पार्टनर दुसर्‍या पार्टनरसोबत संबध ठेवत असल्याच्या संशयातून, त्यानं पार्टनरची हत्या केल्याची माहिती आहे. आरोपीनं ६ महिन्यांपूर्वी पार्टनरची हत्या केली होती. नंतर गुन्हा लपवण्यासाठी त्यानं मृतदेह रेल्वे रूळावर फेकून दिला. पोलिसांनी सखोल तपास केला असता, समलैंगिक मित्रानेच हत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.

या घटने संदर्भात किला पोलीस स्टेशनचे प्रभारी जितेंद्र कुमार सांगतात, १ जून २०२४ रोजी एका तरूणाची हत्या करून त्याचा मृतदेह नावडिया रेल्वे रूळावर फेकून दिला होता. या घटनेनंतर मृत तरूणाच्या आईनं अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात तरूणाची हत्या मित्रानेच केले असल्याची माहिती समोर आलीय. शनिवारी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्या घरातून गळा आवळून हत्या केलेला दोर जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं सांगितले की, त्याचे तरूणासोबत समलैगिंक संबध होते. दोघेही बराच काळ एकमेकांसोबत राहत होते. हा तरूण इतरांच्याही संपर्कात असल्याचा संशय आरोपीला होता. त्यानं आरोपीला विचारले असता, त्यानं कबूल केलं. नंतर आरोपीनं विनंती तरूणाला केली. इतर मुलांसोबत संपर्कात राहू नकोस अशी विनवणी देखील केली.

विनंती करूनही न ऐकल्यानं आरोपीने रागाच्या भरात तरूणाची दोरीनं गळा आवळून हत्या केली आहे. त्यानंतर मृतदेह रेल्वे रूळावर फेकून तो फरार झाला. पोलिसांनी तपास केला असता, मित्रानेच आपल्या समलैंगिक पार्टनरची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पुणे जिल्ह्यातील आज पीक परिस्थिती पाहणी दौरा करणार

Rain Alert: पुढचे ८ तास महत्वाचे! महाराष्ट्रासह १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, राज्यात कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

Automobile Tips : कारमधून सतत पेट्रोल डिझेलचा वास येतोय? 'ही' ६ कारणे वेळीच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT