Rahul Gandhi Lok Sabha Speech  Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi Video : महाभारत, अभिमन्यू आणि चक्रव्यूह; राहुल गांधी यांचं लोकसभेत आक्रमक भाषण

Rahul Gandhi Lok Sabha Speech : आज लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्राच्या अर्थसंकल्पाबाबत आपले मत व्यक्त करताना आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. आपल्या भाषणादरम्यान राहुल यांनी केंद्र सरकार आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला.

Satish Kengar

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज नववा दिवस आहे. आज लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्राच्या अर्थसंकल्पाबाबत आपले मत व्यक्त करताना आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. आपल्या भाषणादरम्यान राहुल यांनी केंद्र सरकार आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला. यावेळी राहुल यांनी महाभारत, अभिमन्यू आणि चक्रव्यूहचा उल्लेख केला आणि अर्थसंकल्प लोकशाही रचनेच्या विरोधात असल्याचे म्हटले.

सभागृहाला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, या सरकारच्या काळात देशात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. ते म्हणाले, या अर्थसंकल्पाचा हेतू हा फक्त व्यवसायात, राजकारणात मक्तेदारी असणाऱ्या आणि केंद्रीय तपास यंत्रणांना बळ देण्याचं आहे.

महाभारत आणि अभिमन्यू-चक्रव्यूह

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, "हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रात अभिमन्यूला चक्रव्यूहमध्ये अडकवून 6 जणांनी मारले होते. मी थोडे संशोधन केले आणि कळले की 'चक्रव्यूह'चे दुसरे नाव 'पद्मव्यूह' आहे, ज्याचा अर्थ आहे कमळाचे फुल.''

ते म्हणाले, ''चक्रव्यूहाचा आकार हा कमळाच्या फुला सारखा आहे. 21व्या शतकात एक नवे चक्रव्यूह निर्माण झाले आहे, तेही कमळाच्या फुलाच्या रूपात. पंतप्रधान हे चिन्ह आपल्या छातीवर लावून चालतात, जे अभिमन्यूसोबत केले गेले, तेच भारतासोबत केले जात आहे. तेच तरुण, शेतकरी, महिला, छोटे आणि मध्यम उद्योगपतींसोबत केले जात आहे.''

राहुल गांधी पुढे म्हणाल, ''आजही चक्रव्यूहच्या केंद्रस्थानी 6 लोक आहेत. पूर्वीप्रमाणेच 6 लोक कंट्रोल करत होते. आजही 6 लोक कंट्रोल करत आहेत, नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत, अजित डोवाल, अंबानी आणि अदानी.'' लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्तक्षेपानंतर राहुल गांधी म्हणाले "जर तुम्हाला हवे असेल तर मी एनएसए, अंबानी आणि अदानी यांची नावे घेत नाही आणि फक्त 3 नावे घेईन."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT