Central Bank of India : बँकेत नोकरी शोधत असलेल्या युवकांसाठी एक खूश खबर आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे. एकूण 250 पदांसाठी ही भरती निघाली आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. या भरतीमध्ये वय माऱ्यादा, फी आणि इतर सर्व महत्वाची माहिती जाणून घेऊ. (Central Bank of India Recruitment)
centralbankofindia.co.in/en या संकेतस्थळाला भेट दिल्यावर तुम्हाला हा फॉर्म भारत येईल. इथे तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडियाची अधिकृत जाहिरात देखील पाहता येईल. 250 जागांमध्ये चीफ मॅनेजर आणि सिनिअर मॅनेजर ही पदे भरली जाणार आहेत.
काय आहे शिक्षणाची अट
पहिल्या पदासाठी अर्ज करत असाल तर इथे तुम्हाला ठराविक शाखेची पदवी असली पाहिजे असे नाही. कोणत्याही शाखेतील पदवीधर या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. चीफ मॅनेजर आणि सिनिअर मॅनेजर या दोन्ही पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी संपादन केलेल्या व्यक्ती अर्ज करू शकतात.
अनुभव किती असावा?
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या भरतीमध्ये तुम्हाला शिक्षणाची अट कोणत्याही शाखेतील पदवी असली तरी अनुभव मात्र जास्त मागितला आहे. चीफ मॅनेजर या पदासाठी तुम्हाला 7 वर्षे या क्षेत्रात नोकरीचा अनुभव असला पाहिजे. तर सिनिअर मॅनेजर या पदासाठी अर्ज करत असाल तर तुमच्याकडे या क्षेत्रातील 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
ठिकाण
संपूर्ण भारतात कोठीही तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. नोकरीचे ठिकाण हे भारत आहे.
परीक्षा शुल्क
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या भरतीमध्ये परीक्षा शुल्क देखील कमी आहे. यात ओबीसी आणि ओपन या दोन प्रवर्गासाठी 850 फॉर्म फी आहे. तर एससी, एसटी, पीडब्लूडी आणि महिला यांसाठी कोणतेही शुल्क नाही.
पगार किती मिळेल?
परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर आणि नोकरी मिळाल्यावर पहिले पद चीफ मॅनेजरसाठी तुम्हाला जास्तीत जास्त 89,890 इतका पगार मिळू शकतो. तर दुसऱ्या पदासाठी 78,230 एव्हढा जास्तीत जास्त पगार मिळेल. तसेच यासाठी वय मर्यादा पहिल्या पदासाठी 40 आणि दुसऱ्या पदासाठी 35 देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.