जगभरात पुन्हा एकदा आर्थिक मंदीचा (Recession) धोका निर्माण झाला आहे. या धोक्यामुळे अर्थतज्ञ याबाबद्दल चिंतेत आहेतच पण सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) यांनाही याची चिंता व्यक्त केली आहे. मस्कसह अनेक लोकांचे मत आहे की विशेषतः अमेरिकेसारखे (US) विकसित देश मंदीच्या उंबरठ्यावर आहेत. असे अनेक घटक आहेत, ज्यामुळे असे दिसते की जागतिक अर्थव्यवस्था (Global Economy) पुन्हा एकदा आर्थिक मंदीच्या कचाट्यात येणार. त्यामुळे हा प्रश्न जागतिक पातळीवर सर्वांना सतावत आहे.
आर्थिक मंदी म्हणजे काय?
जर एखाद्या देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) काही महिने सतत घसरत असेल, तर या कालावधीला अर्थशास्त्रात आर्थिक मंदी म्हणतात. साधारणपणे दोन चतुर्थांश म्हणजे सहा महिने हे प्रमाण मानले जाते. जीडीपी वाढीचा दर (GDP Growth Rate) सतत घसरण्याला आर्थिक मंदी (Economic Slowdown) म्हणतात. याशिवाय अर्थशास्त्रात 'डिप्रेशन' म्हणजेच महामंदी अश्या नावाचा एक शब्द आहे. जर एखाद्या देशाचा जीडीपी 10 टक्क्यांहून अधिक घसरला तर त्याला डिप्रेशन म्हणतात. पहिल्या महायुद्धानंतर 1930 च्या दशकात महामंदी आली, त्याला द ग्रेट डिप्रेशन (The Great Depression) म्हणतात.
-कोरोना महामारी (Covid-19);
2019 पासून संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत आहे. या महामारीने जगभरात Health Crisis पेक्षा अधिक आर्थिक संकट निर्माण केले आहे. सध्या पुन्हा एकदा चीन महामारीच्या नव्या लाटेशी झुंज देत आहे. शांघायसारखी औद्योगिक केंद्रे कडक लॉकडाऊनमधून जात आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांचे प्लांट पुन्हा बंद पडले आहेत.
-रशिया-युक्रेन युद्ध;
रशिया आणि युक्रेन सुरु आहे. प्रदीर्घ तणाव आणि लष्करी तणावानंतर रशियाने फेब्रुवारीमध्ये शेवटच्या दिवसांत युक्रेनवर हल्ला केला. असे मानले जात होते की हे युद्ध फार काळ चालणार नाही कारण रशियाच्या बलाढ्य सैन्यामुळे काही आठवड्यात रशियाला विजय मिळेल. पण, सर्व अंदाज चुकीचे निघाले आणि युद्ध महिना उलटून गेला तरीही सुरूच आहे.
परंतु या युद्धामुळे जगभरात अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश गहू आणि बार्ली यासारख्या अनेक धान्यांचे प्रमुख निर्यातदार आहेत. या युद्धामुळे त्यांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की अनेक देशांसमोर अन्न संकटाची (Food Crisis) परिस्थिती आहे. श्रीलंकाही (Sri Lanka) अशाच संकटाचा सामना करत आहे.
-दशकातील विक्रमी महागाई;
भारताविषयी बोलायचे झाले तर, घाऊक महागाई आणि किरकोळ महागाई दोन्ही गेल्या महिन्यात अनेक वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. एप्रिलमध्ये वर्षांनंतर घाऊक महागाईने 15 टक्क्यांची पातळी ओलांडली आणि ती नोव्हेंबर 1998 नंतर सर्वाधिक झाली. किरकोळ महागाई मे 2014 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर आहे. यूएसमधील किरकोळ चलनवाढ एप्रिलमध्ये 8.3 टक्क्यांपर्यंत कमी झाली, परंतु ती अजूनही दशकांच्या उच्च पातळीवर आहे. यापूर्वी मार्चमध्ये अमेरिकेतील महागाईचा दर 8.5 टक्के होता, जो गेल्या 41 वर्षांतील सर्वोच्च होता.
-वाढती भांडवली किंमत;
महागाई नियंत्रित करण्यासाठी, जगभरातील मध्यवर्ती बँका सतत व्याजदर वाढवत आहेत. भारताबद्दल सांगायचे झाल्यास, रिझर्व्ह बँकेने या महिन्यात एमपीसीची तातडीची बैठक घेतली आणि रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली. भारतातील व्याजदर दोन वर्षे स्थिर होते आणि 4 वर्षांत प्रथमच वाढले आहेत. या आर्थिक वर्षात रेपो दरात 01 टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
-महाग कच्चे तेल;
गेल्या काही महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतीही भडकत आहेत. या किंमती सातत्याने प्रति बॅरल $100 च्या वर राहिल्या आहे. तर, ब्रेंट क्रूड 01 टक्क्यांनी वाढून $113.08 प्रति बॅरलवर पोहोचले. त्याचप्रमाणे वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट 1.4 टक्क्यांनी वाढून $114.02 प्रति बॅरल झाला. तर, अमेरिका आणि इतर युरोपीय देशांनी कच्च्या तेलाच्या सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक असलेल्या रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.