Eknath Shinde News, Shivsena News
Eknath Shinde News, Shivsena News Saam TV
देश विदेश

Shivsena Political Crisis: एकनाथ शिंदेसह बंडखोर आमदारांनी गुजरातमधील मुक्काम हलवला; गुहावाटीत दाखल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गुहावाटी : शिवसेनेसह राज्यातील आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे यांनी आपला गुजरातमधील मुक्काम आता आसामला हलवला आहे. कालपासासून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारे शिवसेना (Shivsena) नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आता गुजरातमधील हॉटेलमधून आपल्यासोबतच्या सर्व बंडखोर आमदारांना घेऊन आज सकाळी ७ वाजता गुहावाटी (Guwahati) येथे पोहचले आहेत. (Eknath Shinde News in Marathi)

यावेळी शिंदे आणि आमदारांना (MLA) नेण्यासाठी आसाम स्टेट ट्रान्सपोर्टच्या बस सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, आसाम विमानतळावरती एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं हिंदुत्व पुढं घेऊन जाणार आहोत असं सांगितलं आहे.

खरी शिवसेना कोणाची ?

तसंच माझ्यासोबत ४० आमदार असून इतर १० आमदारांचा पाठिंबा देखील मिळणार असल्याचं सांगितलं आहे. शिवाय आमचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा देखील शिंदे यांनी केला आहे.

पाहा व्हिडीओ -

शिंदे यांनी आपला मुक्काम हलवल्यामुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. एकीकडे आमच्या शिवसेनेने असे अनेक बंड पचविल्याचा दावा मातोश्री समर्थक शिवसेना नेते म्हणत आहेत. तर आता आमचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे राज्यभरातील आणि विशेषत: मुंबईमधील शिवसैनिकांना आता कोणाचं हिंदुत्व भावणार आणि कोणत्या शिवसेनेच्या कोणत्या गटाला ते पाठिंबा देणार हे पाहणं महत्वाचं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Skin Care: मुलायम त्वचेसाठी रात्री झोपण्यापुर्वी करा 'या' गोष्टी

Sonalee Kulkarni : दुबईमध्ये उगवली शुक्राची चांदणी; साडीत खुललं अप्सरेचं सौंदर्य

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत भर; नायब राज्यपालांनी केली NIA द्वारे चौकशीची मागणी, काय आहे नेमकं प्रकरण?

Today's Marathi News Live: विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध भाजपची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

JP Nadda: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT