RCB Blamed for Bengaluru Stampede Karnataka Government Report saam tv
देश विदेश

बेंगळुरू चेंगराचेंगरीचं खापर RCB वर फुटलं; कर्नाटक सरकारचा अहवाल, विराट कोहलीशी संबंधित व्हिडिओचाही उल्लेख

RCB Held Responsible for Stampede During IPL Celebration : आयपीएल विजयोत्सव साजरा करताना बेंगळुरूत झालेल्या चेंगराचेंगरीचं खापर कर्नाटक सरकारनं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर फोडलं आहे. सरकारनं यासंबंधी एक अहवाल सादर करून त्यात विराट कोहलीच्या एका व्हिडिओचाही उल्लेख केला आहे.

Saam Tv

Who is responsible for Bengaluru IPL victory parade stampede : बेंगळुरू येथे आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीकरिता कर्नाटक सरकारने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला जबाबदार धरले आहे. याबबत सादर करण्यात आलेल्या अहवालात सरकारने क्रिकेटपटू विराट कोहलीचा घटनेशी संबंधित एक व्हिडिओही नमूद केला आहे. 4 जून 2025 रोजी, आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकल्याच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 50 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले होते.

मीडिया रिपोर्टनुसार, कार्यक्रमाचे आयोजक डीएनए एंटरटेंमेंट नेटवर्क्स यांनी 3 जून रोजी पोलिसांना कार्यक्रमाविषयी माहिती दिली होती. परंतु औपचारिक परवानगी त्यांना मिळाली नव्हती. अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी किमान 7 दिवस आधी परवानगी घ्यावी लागते असे अहवालात म्हटले आहे.

अहवालात असेही म्हटले आहे की, आरसीबीने पोलिसांशी विचारविनिमय न करता लोकांना आमंत्रित केले. घटनेच्या दिवशी सकाळी 7 वाजता सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करण्यात आला होता, ज्यात 'लोकांकरिता मोफत प्रवेश' असा उल्लेख होता. लोकांना आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत सहभागी होण्याकरिता आवाहन करण्यात आले होते. ही मिरवणूक विधानसभेपासून सुरू होऊन चिन्नास्वामी स्टेडियमवर संपणार होती.

घटनेच्याच दिवशी म्हणजे 4 जूनला सकाळी 8 वाजता आणखी एक पोस्ट करण्यात आली. सकाळी 8.55 ला आरसीबीने जो व्हिडिओ शेअर केला त्यात विराट कोहली दिसत होता. ज्यात तो, विजयोत्सव बेंगळुरूच्या नागरिकांसोबत साजरा करण्याची इच्छा व्यक्त करत होता.

सरकारने आपली बाजू मांडत म्हटले की, या पोस्टमुळे 3 लाखांहून अधिक लोक सोहळा पाहण्यासाठी जमले. इतक्या मोठ्या जमावाकरिता आयोजक आणि पोलीस तयार नव्हते. त्यानंतर आयोजकांनी स्टेडियममध्ये प्रवेश मिळण्याकरिता पास आवश्यक असल्याचे म्हटले ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला. आयोजक आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन एकमेकांशी समन्वय साधण्यात अपयशी ठरल्याने, तसेच प्रवेशद्वारावर योग्य नियोजनाच्या अभावामुळेच चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

अहवाल सार्वजनिक करण्याचे न्यायालयाचे आदेश

या घटनेचा अहवाल राज्य सरकारने गुप्त ठेवण्याची विनंती कर्नाटक उच्च न्यायालयाला केली होती. परंतु कर्नाटक उच्च न्यायालयाने अशा गुप्ततेला कोणाताही कायदेशीर आधार नसल्याचे सोमवारी (14 जुलै) सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT