Cockroach effigy burning planned alongside Ravana at Ramlila Maidan saam tv
देश विदेश

रामलीला मैदानावर रावणासोबत झुरळही जाळणार; स्वच्छ भारत अभियानाचा दावा की राजकीय निशाणा?

Dussehra Twist in Delhi: दसऱ्यानिमित्त दिल्लीच्या रामलीला मैदानावर दरवर्षी रावणाचं दहन केलं जातं. मात्र, यंदा रावणासोबत झुरळ दहनही होणार आहे. नेमकं कोण करणार आहे हे दहन? कुणी आणि कशामुळे झुरळ दहनाचा निर्णय घेतलाय? पाहूयात या रिपोर्टमधून.

Snehil Shivaji

देशात एकीकडे आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवाचा जल्लोष सुरू आहे, तर दुसरीकडे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यावरून वातावरण चांगलंच तापलंय. पण या सगळ्या राजकीय रणधुमाळीत, राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक रामलिला मैदानातून होणाऱ्या कार्यक्रमानं पु्न्हा देशाचं लक्ष वेधलंय.

होय कारण शंभरपेक्षा जास्त वर्षांपासून दसऱ्याच्या निमित्ताने होणाऱ्या पारंपरिक रावण दहनात यंदा रावणासोबत चक्क महाकाय कॉकरोच सुद्धा जाळण्यात येणारेय. होय... अस्वच्छतेचं प्रतीक म्हणून तब्बल ३० फूटांचा कॉकरोच रावणासोबत दहन करण्याचा निर्णय रामलिला समितीने घेतलाय. या अजब आणि राजकारण तापवणाऱ्या निर्णयामागे रामलिला समितीनं काय म्हटलं पाहा.

अवघ्या 5 महिन्यापुर्वी मुख्य न्यायधीशांच्या एका संदर्भातील कॉक्रोच या शब्दाला देशाच्या तरुणांनी थेट उपरोधाचं धारदार शस्त्र बनवलं. या तरुणांच्या एकजूटीनं जंतरमंतरवरील केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी झालेलं आंदोलन असो, स्कूल ठीक करो देशव्यापी मोहीम असो किंवा आता मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधातील एल्गार असो. देशभरातील तरुणाईने CJP च्या माध्यमातून सत्तेच्या विरोधात रणशिंग फुंकलंय. आता याच काळात रामलिला मैदानात कॉकरोच दहनाचा घाट घातला गेल्याने, यावर राजकारण तापण्याची शक्यता आहे.

रावणासोबत कॉक्रोच जाळण्यामागे कुठलाही राजकीय हेतू नसल्याचा दावा केला जात असला, तरी सध्याच्या ज्वलंत राजकीय वातावरणात या कॉक्रोच दहनाचे तीव्र पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत, हे नक्की. विशेष म्हणजे, दिल्लीच्या या ऐतिहासिक रामलिला मैदानावर दरवर्षी होणाऱ्या या सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आवर्जून उपस्थित असतात. त्यामुळे यंदा खुद्द पंतप्रधानांसमोरच रावणासोबत या कॉकरोचचेही दहन होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय़.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPच्या आंदोलनाआधीच दिपके पोलिसांच्या ताब्यात; दिल्लीत पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा

तिकीट तपासणीवरून महिला प्रवासीचा टीसीसोबत वाद; कांदिवली स्टेशनवर नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! देशातील दोन बँकांचं होणार विलीनीकरण; RBI नं दिली मंजुरी

Saturday Horoscope: चिंता सोडा, आनंदाची बातमी मिळेल! या 3 राशींना मिळणार मानसिक समाधान, वाचा शनिवारचे राशीभविष्य

टाटा पॉवरचं पाणी दुष्काळग्रस्तांना द्या! वीज निर्मिती थांबवावी, सरकारनं तूट भरून काढावी

SCROLL FOR NEXT