Ratan Tata Passed Away  
देश विदेश

Ratan Tata Journey: अमेरिकेत शिक्षण,ट्रेनी म्हणून नोकरी; रतन टाटा यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा!

Ratan Tata Life History: आयआयटी बॉम्बेमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी त्यांनी 2014 मध्ये 95 कोटी रुपयांची देणगी दिली होती. याशिवाय त्यांनी अलीकडेच क्रोएल विद्यापीठाला 28 दशलक्ष डॉलर्स दान केले होते.

Bharat Jadhav

Ratan Tata Passed Away :

भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी रात्री उशिरा निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जवळपास ५० वर्षे ते टाटा समूहात सक्रिय होते. रतन टाटा यांच्या नेतृत्वात टाटा समूहानं केवळ यशोशिखर गाठलं नाही तर, उद्योगविश्वात अनेक नवनवे प्रयोग केले आणि ते यशस्वीही केले.रतन टाटांनी आत्मविश्वासानं अनेक निर्णय घेतले आणि त्यातील अनेक गोष्टी यशस्वी करून दाखवल्या.

रतन टाटा यांचे शिक्षण

१९३७ मध्ये रतन टाटा यांचा जन्म झाला. १७ व्या वर्षी शिक्षणासाठी कॉर्नेल युनिव्हर्सिटी (इथाका, न्यूयॉर्क, यूएसए) येथे गेले. तेथे जवळपास सात वर्षे वास्तुकला आणि इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं. सन १९६२ मध्ये रतन टाटा हे वास्तुकला शाखेतून पदवीधर झाले. त्याच वर्षी त्यांनी पहिल्यांदाच टाटा समूहाची कंपनी टाटा इंडस्ट्रीजमध्ये सहाय्यक म्हणून काम सुरू केले.

जमशेदपूरमध्ये ट्रेनिंग

टाटा इंजिनीअरिंग आणि लोकोमोटिव्ह कंपनी (आताची टाटा मोटर्स) च्या जमशेदपूर प्लांटमध्ये त्यांनी सहा महिने प्रशिक्षण घेतले. त्यानंतर रतन टाटा यांची एका ट्रेनिंग प्रोग्रामसाठी बदली झाली. टाटा आयर्न अँड स्टिल कंपनी म्हणजेच टिस्को (आताची टाटा स्टील) जमशेदपूरमध्ये ही बदली झाली. सन १९६५ मध्ये टिस्कोच्या इंजिनीअरिंग विभागात तंत्रज्ञ अधिकारी म्हणून नेमणूक झाली.

सन १९६९ मध्ये ते ऑस्ट्रेलियाला गेले. तेथे त्यांनी टाटा समूहाचे स्थानिक प्रतिनिधी म्हणून काम केले. सन १०७० मध्ये रतन टाटा भारतात परतले. काही काळासाठी सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसमध्ये ते रुजू झाले. सन १९७१ मध्ये त्यांची नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्सचे प्रभारी संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली.

रतन टाटा यांचा प्रवास

१९७४ - टाटा सन्सच्या मंडळात संचालक म्हणून सहभागी झाले.

१९८१ - टाटा इंडस्ट्रीजचे चेअरमन म्हणून नेमणूक

१९८६-१९८९ - एअर इंडियाचे चेअरमन

२५ मार्च १९९१ - रतन टाटा यांनी टाटा सन्सचे चेअरमन आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर टाटा समूहानं आपल्या उद्योगाचा विस्तार केल आणि देशासह जगभरात अमिट छाप उमटवली.

२००८ - रतन टाटा यांना भारत सरकारने देशाचा सर्वोच्च दुसरा नागरी सन्मान पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवलं.

डिसेंबर २०१२ - रतन टाटा यांनी टाटा समूहात ५० वर्षे विविध पदांवर जबाबदारी सांभाळल्यानंतर टाटा सन्सच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांची टाटा सन्सच्या मानद चेअरमनपदी नेमणूक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT