Pakistan Parliament Rat Saam Tv
देश विदेश

Pakistan Parliament Rat: पाकिस्तानच्या संसदेत उंदरांचा सुळसुळाट, खासदार धास्तावले, बंदोबस्तासाठी 12 लाखांच्या मांजरी आणणार

Pakistan Parliament : सोशल मीडियावर अनेकदा पाकिस्तानमधी अनेक घटना व्हायरल होत असतात.त्यात पुन्हा एकदा पाकिस्तानमधील बातमी व्हायरल होत आहे.मात्र सध्या यात जे काही आहे ते तुम्ही वाचाच.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तनला गेल्या काही महिन्यांपासून गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानने आर्थिक मदतीसाठी चीन आणि सौदी अरेबिया या राष्ट्रांकडे मदत मागितली आहे. आर्थिक संकटाचा सामना करण्यापासून ते पाकिस्तानमधील राजकीय वातावरण ही आपल्याला अस्थिरतेचे असलेले दिसून येते.

सामान व्यक्तीला महागाईचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. त्यात सर्वत्र पाकिस्तानमधीस एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.ज्या माहितीनुसार पाकिस्तान सरकार तेथील संसदेतील उंदरांमुळे मोठ्या प्रमाणात हैराण झालेले आहे त्यामुळे संसदेत फक्त मांजरी(Cat) तैनात करण्यासाठी तब्बल १२ लाख रुपये खर्च करणार असल्याचे समजते

पाकिस्तान असो वा कोणतेही ठिकाण प्रत्येकजण तेथे होणाऱ्या उंदरांमुळे मोठ्या प्रमाणात त्रस्त होतो.मात्र पाकिस्तान (Pakistan)आर्थिक संकटातून जात असताना फक्त उंदरांसाठी एवढा खर्च करणार आहे त्याचा परिणाम सामान्य नागरिकांना बसत आहे. पाकिस्तानातील संसदेत प्रत्येक खासदार या उंदरांमुळे हैराण झाले आहेत त्याच कारणांमुळे संसदेतील उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी मांजरी आणण्यात येणार आहेत. पाकिस्तामधील 'कॅपिटल हेव्हलपमेंट ऑथोरिटीने' संसदेतील या उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी हा निर्णय घेतलाय.

कशामुळे हा निर्णय घेतला?

आपल्यापैंकी अनेकांच्या घरात कधीना कधी उंदरांमुळे(Rat) अनेकजण हैराण झाले आहे. घरात उंदरांचा शिरकाव झाल्यास अनेक वस्तूचे नुकसान होते.खाद्य पदार्थांचे सामान असो वा कोणतीही वस्तू संपूर्ण नासधुस झाल्याशिवाय उंदीर राहत नाही,अशीच अवस्थाही पाकिस्तानच्या संसदेत झाली होती. संसदेत असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या फायली उंदरांनी कुरतडल्या होत्या शिवाय संगणकाचे वायरिचेही उंदरांमुळे नुकसान झाले होते.

भितीचे वातावरण

एकीकडे आर्थिक(Financial) चणचण आणि दुसरीकडे बारा लाख हा खर्च, हे ऐकल्यानंतर प्रत्येकाला प्रश्न पडलाच असेल,मात्र कारणही तसेच आहे.जेव्हा संसदेत कामकाज सुरु असताना अनेक खासदार कामानिमित्ताने आले होते,त्यावेळी संसदेत असलेल्या उंदरांनी खासदाराच्या पायांचा चावा घेण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर तात्काळ उंदारांच्या भितीने धास्तावलेल्या खासदारांनी संसदेत उंदरांचा बंदोबस्तासाठी १२ लाखांच्या मांजरी आणणार असल्याचे आदेश दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT