Raosaheb Danve Meet Balasore Accident Victims: जेष्ठ भाजप नेते व केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ओडीशाच्या बालासोर येथील रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांची (families of Balasore accident victims) भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. बिहारच्या नवादा जिल्ह्यातील मरडा गावी जाऊन दानवेंनी पप्पू माँझी तसेच कपस्या गावी मिथलेश राय या दोन तरुणांच्या कुटूंबिंयाना भेटून संवेदना व्यक्त केल्या. बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
रावसाहेब दानवे हे बिहारमधील नवादा आणि वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघांच्या चार दिवसीय दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रात भाजप सरकारला 9 वर्षे पुर्ण झालीत म्हणून महाजनसंपर्क अभियानासह विविध उपक्रम व कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. गेल्या तीन दिवसांपासून दानवे यांनी अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत.
या दरम्यान दानवे यांनी ओडीसाच्या बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोन तरुणांच्या घरी जाऊन कुटूंबियांना भेटून संवेदना व्यक्त केल्या. दानवे यांनी मृतांच्या आई, पत्नी, भाऊ, बहिण आणि मुलांना धीर दिला. त्यांच्या परिवाराला केंद्र सरकार कडून 9.50 लाख रुपये चेक द्वारे आणि 50 हजार रोख रक्कम अशी मदत देखील केली. (Latest Political News)
तसेच अपघतात जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात आले आहेत. यासोबतच दानवे यांनी येथील मडरा गावातील जखमींना भेटून त्यांची विचारपूस केली. तसेच लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. यावेळी नवादा जिल्हाध्यक्ष अनिल मेहता, मंडल भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.