Ranil Wickremesinghe Srilanka New President  Saam TV
देश विदेश

मोठी बातमी! श्रीलंकेला मिळाले नवे राष्ट्राध्यक्ष; रानिल विक्रमसिंघे यांचा दणदणीत विजय

रानिल विक्रमसिंघे यांची श्रीलंकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

कोलंबो : श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर आज देशाच्या नव्या राष्ट्रपतीची निवड करण्यात आली. रानिल विक्रमसिंघे यांची श्रीलंकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. विक्रमसिंघे ६ वेळा श्रीलंकेचे पंतप्रधान राहिले आहेत. याआधी त्यांनी राजकीय गोंधळात पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. (Ranil Wickremesinghe Srilanka New President)

राजपक्षे देश सोडून पळून गेल्यानंतर ते काळजीवाहू म्हणून काम करत होते. अध्यक्षपदाच्या शर्यतीत, विक्रमसिंघे यांचा सामना दुल्लास अलाहपेरुमा आणि अनुरा कुमारा दिसानायके यांच्याशी होता. स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिले मत स्पीकरने तर दुसरे मत रानिल विक्रमसिंघे यांनी दिले.

223 सदस्यांच्या संसदेत दोन खासदार गैरहजर होते. राष्ट्रपतीपदासाठी एकूण 219 जणांनी मतदान केलं. मतदानासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. मतमोजणीदरम्यान, 4 मते अवैध ठरविण्यात आली. यामध्ये विक्रमसिंघे यांना तब्बल 134 मतं मिळाली. विक्रमसिंघे हे यापूर्वी दोनदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. मात्र यावेळी त्यांनी बाजी मारली. त्यामुळे आता विक्रमसिंघे हे श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती असणार आहे.

दरम्यान, आर्थिक संकट ओढवलेल्या श्रीलंका देशाची लोकसंख्या जवळपास 22 कोटींच्या घरात आहे. त्यामुळे विक्रमसिंघे यांच्यासमोर आता देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचं आव्हान असेल. श्रीलंकेत अन्नधान्य, इंधन, औषधी यासारख्या जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा जाणवत आहे.

रनिल विक्रमसिंघे यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते 6 वेळा श्रीलंकेचे पंतप्रधान राहिले आहेत. त्यांच्या युनायटेड नॅशनल पक्षाचा संसदेत एकच खासदार आहे. राजकारणात येण्यापूर्वी रणील पत्रकार आणि वकीलही आहेत. 1977 मध्ये सार्वत्रिक निवडणूक जिंकून ते पहिल्यांदाच खासदार झाले. 1993 मध्ये ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

SCROLL FOR NEXT