Ranchi Accident News 
देश विदेश

हृदयद्रावक : दिवाळीनिमित्त बसमध्ये दिवे लावून झोपले अन् बसने घेतला पेट; चालकासह कंडक्टरचा होरपळून मृत्यू

दिवाळीनिमित्त लक्झरी बसमध्ये दिवे लावून झोपलेल्या चालक, क्लिनरसह संपुर्ण गाडी जळून खाक झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Diwali Accident : देशभरात दिवाळीची (Diwali) धामधुम सुरु आहे. दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली जात आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे दिवाळीत घरासह सर्व परिसर आपण दिव्यांनी उजळून काढत असतो.

मात्र, याच दिव्यांमुळे दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दिवाळीनिमित्त लक्झरी बसमध्ये (Luxury Bus) दिवे लावून झोपलेल्या चालक, क्लिनरसह संपुर्ण गाडी जळून खाक झाल्याची दुर्देवी घटना रांचीमधील (Ranchi) लोअर बाजार पोलीस ठाणे (Lower Bazar Police Station) भागात खादगढा बस स्टँडवर घडली आहे.

पाहा व्हिडीओ -

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीनिमित्त बसच्या चालक आणि वाहकाने आपल्या बसमध्ये देखील दिवे लावले आणि ते गाडीत झोपले. मात्र या दिव्याने काही वेळात पेट घेतल्यामुळे संपुर्ण गाडी जळून खाक झाली आणि दुर्दैवाने गाडीमध्ये झोपलेल्या ड्रायव्हर आणि क्लिनरचा होरपळून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनासह अग्निशमन दलाला (Fire Brigade) माहिती देण्यात आली होती. मात्र, अग्निशमन दल पोहोचेपर्यंत बस पुर्णपण जळून गेली होती. तर पोलिसांनी ड्रायव्हर आणि क्लिनरचा (Driver and Cleaner) जळालेले मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.

दरम्यान, देशभरात दिवाळीच्या रात्री आगी लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात काही जणांना गंभीर दुखापती देखील झाली आहे. पुण्यातील (Pune) औंध येथे फटाक्यांमुळे लागलेल्या आगीमध्ये थ्री बीएचके फ्लॅटचा जळून अक्षरश: कोळसा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: लय अवघड हाय गड्या.. दोनदा बॅटिंगला येऊनही विराटला अवघ्या इतक्याच धावा करता आल्या

Diljit Dosanjh : दिलजीत दोसांजला पोलिसांची नोटीस; नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, सीसीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध सुरू

Bachchu Kadu : सरकार किसकी भी हो.. हुकूमत हमारी होती है; नेवासा येथील सभेत बच्चू कडू यांचे वक्तव्य

Ooty : बॉलिवूडच्या 'या' सुपर हॉरर चित्रपटाचे शूटिंग झालंय उटीमध्ये, हिवाळ्यात अनुभवाल धुक्याच्या टेकड्या

SCROLL FOR NEXT