राम मंदिरातील दान चोरीचा एसआयटीचा तपास जसजसा पुढे सरकतोय तशी धक्कादायक माहिती समोर येतेय. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या नावाने छापलेले देणग्यांचं एक बनावट पावती पुस्तक जप्त करण्यात आलंय. एसआयटीने अटक केलेल्या आठ आरीपींचे आणखी धक्कादायक कारनामे समोर आले आहेत. हे आरोपी मंदिरातील केवळ दान चोरत नव्हते तर भक्तांना बनावट पावत्या देऊन त्यांच्याकडून देणग्यांची लूट करत असल्याचं उघड झालंय.
या बनावट पावत्यांवर श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे नावही छापलेले होते
ही पावती अगदी मूळ पावतीसारखीच दिसत असल्याने भक्तांना ही फसवणूक लक्षात येत नव्हती
मंदिरात नवीन ऑनलाईन पावती प्रणाली लागू झाल्यानंतर आरोपींनी या बनावट कागदी पावत्या वापरणे बंद केले
कागदी पावती प्रणाली बंद झाल्यानंतर भाविकांनी थेट मंदिराच्या बँक खात्यात देणगी पाठवण्यास किंवा मंदिराच्या आवारातील दान काउंटरवरून अधिकृत पावत्या घेण्यास सुरुवात केली. दरम्यान देणग्यांच्या गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सर्व मौल्यवान वस्तू सुरक्षित असल्याचा दावा केला. त्यात सोन्याचं रामचरितमानस, प्रभू रामाचं चरण चिन्ह, हार आणि काकभुशुंडी आदी वस्तू पत्रकार परिषदेत दाखवण्यात आल्या. दरम्यान चोरी प्रकरणानंतर ट्रस्टला आता जाग आली आहे. ट्रस्टवर लवकरच सीईओची नेमणूक केली जाईल, अशी माहिती स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी दिली.
राम मंदीरात ५ जून रोजी चोरी उघडकीस आली होती. त्यानंतर चोरलेले पैसे पोलिसांच्या मदतीने परत मिळवले. मात्र ट्रस्टचे तत्कालीन महासचिव चंपत राय यांनी स्वत:हून पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे ते सर्वाधिक वादाच्या भोवऱ्यात सापडले. आता त्यांचाच ड्रायव्हर मुख्य आरोपी असल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई का होत नाही? की राजीनामा दिल्यामुळे त्यांची यातून सुटका झालीय? असा सवाल उपस्थित होतोय. त्यामुळे दोषी कितीही मोठा असो त्याच्यावर कारवाई व्हायलाच हवी? अन्यथा ही कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेशी प्रतारणा होईल एवढं नक्की.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.