Opposition MPs dressed as sadhus stage a dramatic protest inside Parliament premises over the Ram Temple donation controversy saam tv
देश विदेश

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी, संसद आवारात अवतरले मंदिरातले 'साधू', लोकसभा अध्यक्षांचा आंदोलनाला आक्षेप

Ram Temple Donation Row Opposition Protest Parliament: संसदेतील अधिवेशनाचा कालचा दिवस गाजला तो खासदारांनी केलेल्या अनोख्या आंदोलनानं.. राम मंदिर दानचोरीचा विरोधकांनी कसा समाचार घेतला ? आणि सरकारची कशी कोंडी केली ? पाहूयात या रिपोर्टमधून...

Snehil Shivaji

जंतरमंतरवर जमलेल्या जेन-झींनी पेपरफुटीच्या विरोधात पुकारलेलं आंदोलन देशातलं पहिलं वेगळं आंदोलन ठरलं. जेनझींनी आपली कल्पकता सृजनशीलतेचा पुरेपुर वापर करुन सरकारची पुरती कोंडी केली आणि आता याच धर्तीवर राम मंदिरातील दानचोरीवरुन विरोधकांनी सरकारला जेरीस आणण्याचा प्रयत्न केलाय. संसदेत बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी थेट संसदेच्या आवारातच राममंदिरातल्या चंदाचोरीवर अभिनव आंदोलन केलं.....

दबंग नेते अशी ओळख असलेल्या पप्पू यादव संसदेत साधूच्या वेषात अवरतले..संसदेच्या परिसरात मग सुरु झालं राम मंदिर दानचोरीचं रिक्रीएशन.. यावेळी भक्त म्हणून विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनीही या स्कीटमध्ये सहभाग घेतल्याचं दिसलं. राम मंदिरात कशी दान चोरी झाली साधू संताच्या वेषातील ढोगींनी रामलल्लाला कसं लुटलं हेच या खासदारांनी संसदेत दाखवून देशाचं लक्ष वेधून घेतलं....मात्र लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांच्या या आंदोलनावर तीव्र नापसंती व्यक्त केलीय़.

दरम्यान पप्पू यादव यांनी नागाची पुजा करतानाचा दुसरा व्हिडिओही शेअर केलाय... त्यामुळे पप्पू यादव यांनी प्रभू श्रीरामाचा आणि सनातन धर्माच्या अपमान केल्याचा आरोप करत हिंदू संघटनांनी मिर्जापूर, मथुरेसह उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी आंदोलनं केलेत...

मुळात संसदेत एखाद्या मुद्यावर लक्ष वेधून घेण्यासाठी अतरंगी वेषभूषेत येणं, पोस्टर झळकावणं, कांद्याच्या माळा घालून येणं हे काही नवीन नाही. मात्र पप्पू यादवांनी केलेल्या या अभिनव पथनाट्यानं सत्ताधाऱ्यांसह संपुर्ण देशाचं लक्षही वेधून घेतलं...त्यामुळे राजकीय विश्वात याच आंदोलनाची चर्चा रंगली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijeet Dipke Announcement: अभिजीत दीपके राजकारणात येणार? निवडणुकीसंदर्भात केली मोठी घोषणा

दिल्लीत जंतरमंतरला अभेद्य तटबंदी, सुरक्षेसाठी 8 फूट उंच बॅरिकेड्स, भविष्यातील आंदोलनांवर नियंत्रणाची रणनीती?

पंतप्रधान मोदींची विद्यार्थ्यांना माफी, पोलीस आंदोलकांवरील गुन्हे कधी मागे घेणार?

सिद्धिविनायक मंदिरातील चोर कोण? सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंचे खळबळजनक आरोप

Antilia Bomb Scare Case: सचिन वाझे आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावर ५ वर्षांनी आरोप निश्चित

SCROLL FOR NEXT