राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा (ram mandir) अवघ्या ११ दिवसांवर येवून ठेपली आहे. श्री रामजन्मभूमीवर बांधलेल्या मंदिरात भाविकांना दर्शन देणार आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, रामलल्लाचं जन्मस्थान कसं सापडलं? उज्जैनचे राजे विक्रमादित्य यांनी अयोध्येचा शोध कसा लावला? याविषयी सविस्तर जाणून घेवू या. त्रेतायुगातील श्रीरामाची अयोध्येची अनेकवेळा घडमोड झालीय. परंतु, मर्यादा पुरुषोत्तमची चिन्हे आजही कायम आहेत. ही चिन्हे शोधण्यात राजा विक्रमादित्य यांचं सर्वात मोठं योगदान मानलं जातं. (ram mandir latest update)
त्रेतायुगातील अयोध्या लाखो वर्षांनी द्वापार आणि हजारो वर्षांच्या कलियुगानंतरही सापडली आहे. इतिहासाच्या पानांमध्ये याचं श्रेय राजा विक्रमादित्य यांना दिलं गेलं आहे. इतिहासकार सांगतात की, ख्रिस्तपूर्व ५७ वर्षांपूर्वी रामनवमीच्या दिवशी राजा विक्रमादित्य गुप्तर घाटावर विश्रांती घेत होते. यावेळी त्यांची भेट तीर्थराज प्रयाग यांच्याशी झाली. त्यांच्याच प्रेरणेने राजा विक्रमादित्यने राम जन्मभूमीचा शोध सुरू केला. प्रयागराज यांनी सूचना दिल्या आणि त्यानंतर विक्रमादित्य लोमस ऋषींना भेटले. लोमस ऋषींच्या सांगण्यावरूनच राजा विक्रमादित्य पुढे गेले. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अयोध्येचा प्राचीन इतिहास
अयोध्येचा (ayodhya) इतिहास खूप प्राचीन आहे. या शहराची स्थापना मनूने केली होती, असं मानलं जातं. अयोध्या ही प्राचीन भारतातील कौशल देशाचा सूर्यवंशी राजा हरिश्चंद्र यांचीही राजधानी होती. यानंतर त्रेतायुगात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा अवतार झाला. त्यांच्या रामराज्याची आजही कल्पना आहे. अयोध्येवर संशोधन करणारे आचार्य मिथलेशानंद शरण यांनी सांगितलं आहे की, राजा विक्रमादित्यने गायीच्या माध्यमातून राम जन्मभूमी ओळखली. जिथे गाईच्या कासेतून दूध वाहू लागले, तेव्हा त्यांना रामजन्मभूमी सापडली.
कलियुगात त्रेतायुगातील अयोध्येचा शोध लावणारा राजा विक्रमादित्य (King Vikramaditya) यांच्याशी संबंधित ऐतिहासिक तथ्ये रुद्रयामल ग्रंथातही नमूद आहेत. राजा विक्रमादित्य आणि त्याच्या जन्मस्थानाविषयी ऐतिहासिक तथ्ये रुद्रयामल ग्रंथात नमूद आहेत. अयोध्येचा शोध पूर्ण झाल्यानंतर, राजा विक्रमादित्य यांनी येथे ३६० हून अधिक मंदिरे बांधली, ज्यामध्ये भव्य राम मंदिराचा समावेश होता. राजा विक्रमादित्यने अयोध्येचा (ram temple) जीर्णोद्धार केला. राजा विक्रमादित्यने बांधलेले रामलल्लाचे मंदिर १५२८ मध्ये अकबराचा सेनापती मीर बाकी याने पाडल्याचं सांगितलं जातं. नागेश्वर नाथ मंदिरानेही अयोध्येच्या शोधात राजा विक्रमादित्यला रस्ता दाखवला होता, असं म्हटलं जातं. अयोध्येचा शोध राजा विक्रमादित्यसाठी आव्हानात्मक होता. पण, त्यांनी आपलं काम चोख बजावलं. स्कंद पुराणातही प्राचीन अयोध्येचा उल्लेख आढळतो.
अनेक ऐतिहासिक तथ्ये
राजा विक्रमादित्यनंतर, इतर अनेक राज्यकर्त्यांनी देखील अयोध्येचा विकास केला. ज्यामध्ये गुप्त काळातील राजे आणि गहडवाल राजांचे मोठे योगदान होते. प्राचीन अयोध्येशी (Ayodhya) संबंधित अनेक ऐतिहासिक तथ्ये आहेत. त्याचा उल्लेखही वेगवेगळ्या ठिकाणी आढळतो. विदेशी लेखक हंस बेकर यांच्या पुस्तकातही अयोध्येच्या इतिहासाशी संबंधित अनेक पैलू आहेत. विदेशी लेखक हंस बेकर यांनी रामजन्मभूमी, अयोध्या आणि राजा विक्रमादित्य (King Vikramaditya) यांच्याविषयी लिहिले आहे. त्यांच्या पुस्तकासोबत कोणती धार्मिक स्थळे, कशी आणि कोणत्या अंतरावर आहेत हेही सांगितले आहे. या पुस्तकात मौखिक इतिहासावरही अधिक भर दिला आहे.
परकीय आक्रमण आणि मुघल राजवट यामुळे अयोध्येत पुन्हा एकदा अशांतता निर्माण झाली. तेथील सर्व काही उद्ध्वस्त झाले. आज पुन्हा अयोध्येचं वैभव परत येतंय. करोडो हिंदू उत्साही आहेत. अयोध्येचा इतिहासही गौरवशाली असून सध्या या शहराची शान वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्वप्न साकार होतंय. अयोध्या एका नव्या रंगात आणि नव्या रुपात संपूर्ण जगासमोर येण्यास सज्ज झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.