Ram Mandir Earnings Saam TV
देश विदेश

Ram Mandir Earnings: राम मंदिरामुळे UP सरकारचं उत्पन्न वाढणार; दरवर्षी किती कमाई होणार?

Ram Mandir: पर्यटन स्थळ म्हटल्यावर येथे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना देखील रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे. अशात अयोध्येतील राम मंदिराचा उत्तर प्रदेशमधील सरकारला किती प्रमाणात आर्थिक फायदा होणार याबाबत माहिती जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

Ram Mandir Benefit For Uttar Pradesh:

गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण भारत ज्या दिवसाची वाट पाहत होता तो दिवस आज आला आहे. आज अयोध्या नगरीत मोठ्या उत्साहात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्यामध्ये हा सोहळा पार पडणार असल्याने अयोध्या हे एक मोठं पर्यटन स्थळ बनलं आहे. पर्यटन स्थळ म्हटल्यावर येथे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना देखील रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे. अशात अयोध्येतील राम मंदिराचा उत्तर प्रदेशमधील सरकारला किती प्रमाणात आर्थिक फायदा होणार याबाबत माहिती जाणून घेऊ.

अयोध्येत बांधण्यात आलेल्या राम मंदिरामुळे सरकारला 20,000 ते 25,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक फायदा होणार आहे. एसबीआयच्या एका रिसर्च रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार साल 2024 मधील टॅक्स रेव्हेन्यू 2.5 लाख करोड रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. 2022 च्या तुलनेत 2024 मध्ये पर्यटकांकडून होणारा खर्च दुप्पट असणार आहे.

साल 2022 मध्ये राज्यातील पर्यटकांनी येथे फिरण्यासाठी 2.2 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. तर परदेशी पर्यटकांनी येथे 10 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत.

समोर आलेल्या रिपोर्टमध्ये पुढे असंही म्हटलं आहे की, साल 2028 मध्ये भारताची आर्थिक स्थिती 5 ट्रिलियन डॉलरवर पोहचलेली असेल. तर उत्तर प्रदेशमधील जीडीपी 500 अरब डॉलरवर पोहचलेला असेल. जीडीपी वेटेजमध्ये भारतात उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर असेल.

अयोध्येमध्ये त्रेता ठाकुर, छोटी छावणी, तुलसी स्मारक भवन, बहु बेगम मकबरा ही देखील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत. तुम्ही अयोध्यानगरीत फिरण्यासाठी गेल्यावर येथेही भेट देऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदलणार?

Pimpri Chinchwad Crime : ज्येष्ठ नागरिकाला बांधून बंगल्यात दरोडा; राजस्थानी दरोडेखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर अत्याचार, प्रायव्हेट फोटो काढून ब्लॅकमेलिंग, काळंनिळं होईपर्यंत मारलं; बीड हादरलं

श्रावणात वांगी का खाऊ नये? जाणून घ्या

Saiyaara: 'सैयारा' चित्रपटासाठी 'ही' बॉलिवूडची फेमस जोडी होती पहिली पसंती

SCROLL FOR NEXT