Ram Mandir CEO Interview Saam Tv
देश विदेश

Ram Mandir: तुम्ही जानवे घालता का?, मांसाहार करता का? राम मंदिराच्या CEO पदाच्या उमेदवारांना विचारले गेले १८ प्रश्न

Ram Mandir Trust CEO Interview: राम मंदिराच्या सीईओ पदासाठी मुलाखती झाल्या. या पदासाठी ५,२०० उमेदवारांमधून १८ उमेदवारांची निवड करण्यात आली.

Priya More
  • राम मंदिर सीईओ पदासाठी मुलाखती सुरू

  • सीईओ पदाच्या उमेदवारांना विचारलेले १८ प्रश्न

  • राम मंदिर सीईओ मुलाखतीत जानवे आणि मांसाहारावर प्रश्न विचारण्यात आले

  • अयोध्या राम मंदिर सीईओ निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती समोर

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ पदासाठीच्या उमेदवारांची मंगळवारी मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये उमेदवारांना १८ प्रश्न विचारण्यात आले होते. त्यांना त्यांच्या धार्मिक प्रथा, आहाराच्या सवयी आणि राम मंदिराबाबतची दूरदृष्टी यांसारखे प्रश्न विचारण्यात आले होते. राम मंदिराच्या सीईओ पदासाठी ५,२०० उमेदवारांमधून १८ उमेदवारांची निवड करण्यात आली. यापैकी ७ उमेदवारांची मुलाखत पहिल्याच दिवशी घेण्यात आली.

सीईओ पदासाठी उमेदवारांची जी मुलाखत घेण्यात आली होती त्याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. सूत्रांनुसार, या उमेदवारांना त्यांच्या कामाचा अनुभव, कुटुंब आणि हिंदू चालीरीतींचे पालन याबद्दलही प्रश्न विचारण्यात आले. राम मंदिराच्या निधीच्या गैरव्यवहाराचे आरोप समोर आल्यानंतर पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. निधीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांनंतर ट्रस्टच्या आर्थिक व्यवस्थापनाची चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणी आतापर्यंत ८ आरोपींना अटक करण्यात आली. तर या प्रकरणात राम मंदिर ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय यांच्यासह ३ अधिकाऱ्यांना आपल्या पदांचा राजीनामा द्यावा लागला.

अयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टच्या सीईओ पदासाठी झालेल्या मुलाखतीपूर्वी सर्व उमेदवारांना ३४-मुद्द्यांचा एक गूगल फॉर्म भरावा लागला होता. त्यांना त्यांच्या नेतृत्व क्षमतेबद्दल आणि धार्मिक-सामाजिक संबंधांबद्दलही प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रक्रियेबाबत एका व्यक्तीने सांगितले की, सुरुवातीला सर्व १८ उमेदवारांची मुलाखत ऑनलाइन घेण्यात आली. मंगळवारी, ४ माजी आयएएस अधिकाऱ्यांसह फक्त ८ उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये त्यांना १८ प्रश्न विचारण्यात आले होते.

गूगल फॉर्ममध्ये विचारलेल्या प्रश्नांमध्ये 'तुम्ही जानवे घालता का?', 'तुम्ही पूर्णपणे शाकाहारी आहात की मांसाहारी भोजन करता?', 'तुम्ही मद्यपान करता का?', 'तुम्ही कट्टर हिंदू आहात का?', 'तुम्हाला हिंदू धर्मानुसार कपडे घालण्यास सोयीस्कर वाटेल का?', 'तुम्ही यापूर्वी कुठे काम केले आहे?', 'तुम्ही मोठ्या गर्दीला सांभाळू शकाल का?', 'तुमची प्रभू रामावर श्रद्धा आहे का?' असे प्रश्नही विचारण्यात आले होते. या मुलाखतीमध्ये त्यांच्या कुटुंबाबद्दलही प्रश्न विचारण्यात आले. प्रत्येक उमेदवाराची मुलाखत सुमारे एक ते दोन तास चालली. या मुलाखतीदरम्यान, उमेदवारांच्या प्रशासकीय कौशल्यांबरोबरच त्यांची भक्ती, स्वभाव आणि दूरदृष्टी याबद्दल माहिती गोळा केली गेली.

अयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टच्या सीईओ पदासाठी मुलाखतीमध्ये अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची ओळख अद्याप जाहीर झाली नाही. असे असले तरी अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी आयपीएस अधिकारी राजेश पांडे हे उमेदवारांमध्ये आहेत. त्यांची मुलाखत आज होणार आहे. पांडे हे उत्तर प्रदेशचे माजी आयजी आहेत. त्यांनी लखनौचे एसएसपी आणि यूपी स्पेशल टास्क फोर्सचे संस्थापक म्हणून काम केले आहे. बरेलीमध्ये आयजी म्हणून सेवा बजावल्यानंतर ते निवृत्त झाले. ते लखनौच्या अलिगंज येथील ऐतिहासिक हनुमान मंदिराचे सचिव देखील आहेत. सणासुदीच्या काळात या मंदिरात प्रचंड गर्दी होते. फैजाबादचे जिल्हाधिकारी राहिलेले निवृत्त आयएएस अधिकारी योगेश्वर मिश्रा यांनी देखील मुलाखत दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live Update : शिंदेंनीच ठाकरेंना पक्षातून काढलं; सुप्रीम कोर्टात सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद

Maharashtra News Live Update : घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर पोहचला

Weight Loss: ट्रेडमिल की बाहेर चालणे? वजन कमी करण्यासाठी जाणून घ्या कोणता पर्याय ठरेल अधिक फायदेशीर

Beauty Tips : मानेवर चामखीळ किंवा तीळ घाण दिसतोय? या घरगुती उपायांनी करा कायमचा उपाय

Janhvi Kapoor: अश्लील फोटोप्रकरणी जान्हवी कपूरला हाय कोर्टाचा दिलासा; पण, फॅन पेजेस ब्लॉक करण्यास नकार

SCROLL FOR NEXT