BJP Setback In Haryana Saam TV
देश विदेश

Politics: महाराष्ट्रापासून ते बिहार-ओडिशापर्यंत भाजपचा विजय, पण हरियाणात फक्त ०.३ टक्क्यांनी कसा झाला पराभव? वाचा सविस्तर

BJP Setback In Haryana: राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. बिहार, ओडिशा आणि हरियाणाती राज्यसभेच्या जागांसाठी मतदान पार पडले. सगळीकडे भाजपचा विजय झाला पण हरियाणात फक्त ०.३ टक्क्यांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला.

Priya More

Summary:

  • राज्यसभेच्या ११ जागांसाठी ३ राज्यात सोमवारी मतदान पार पडले

  • एनडीएचा ११ पैकी ९ जागांवर विजय

  • बिहार आणि ओडिशामध्ये मोठं यश

  • हरियाणामध्ये फक्त ०.३ टक्क्यांनी भाजपचा पराभव

राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १० राज्यांमध्ये मतदान पार पडले. १० पैकी ७ राज्यांमध्ये बिनविरोध निवडणूक झाली. उर्वरीत हरियाणा, बिहार आणि ओडिशा येथील ११ राज्यसभा जागांसाठी सोमवारी निवडणुका पार पडल्या. राज्यसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागांवर एनडीएला यश मिळवण्यात यश मिळाले.

सोमवारी ३ राज्यात पार पडलेल्या निवडणुकीमध्ये बिहारमधील सर्वच्या सर्व ५ जागांवर एनडीएच्या उमेदवारांनी विजय मिळवला. ओडिशामधील चारपैकी ३ जागांवर भाजपला विजय मिळवण्यात यश आले. या हरियाणा, बिहार आणि ओडिशा या तीन राज्यांमधील ११ पैकी ९ जागांवर एनडीएने विजय मिळवला. जर हरियाणामध्ये भाजपचा ०.३ टक्के मतांनी पराभव झाला. हा पराभव झाला नसता तर हा आकडा १० पर्यंत पोहोचला असता.

बिहारमधील विजयी एनडीए उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार, भाजप अध्यक्ष नितीन नवीन, आरएलएसपी अध्यक्ष उपेंद्र कुशवाह, केंद्रीय मंत्री रामनाथ ठाकूर आणि पाचवे उमेदवार शिवेश राम यांचा समावेश आहे. ओडिशातील ४ जागांपैकी एनडीएने ३, तर बीजेडीने १ जागा जिंकली. ओडिशा भाजपचे अध्यक्ष मनमोहन सामल, बीजेडीमधून भाजपमध्ये आलेले सुजित कुमार आणि भाजपचे माजी नेते आणि सध्याचे पक्षाचे उमेदवार दिलीप राय विजयी झाले.

सोमवारी हरियाणातील २ राज्यसभा जागांसाठी झालेल्या मतदानावरून रात्री उशिरापर्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. मतमोजणी सुमारे साडेपाच तास उशिरा सुरू झाली होती आणि मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास निकाल लागला. भाजप-समर्थित अपक्ष उमेदवाराचा अगदी थोड्या फरकाने पराभव झाला. या दोन जागांपैकी एक जागा काँग्रेसला तर दुसरी भाजपला मिळाली. याठिकाणी भाजपचे उमेदवार संजय भाटिया यांचा विजय निश्चित होता पण काँग्रेसचे उमेदवार कर्मवीर बौद्ध यांना जिंकण्यासाठी मोठी धडपड करावी लागली. त्यांनी भाजप-समर्थित अपक्ष उमेदवार सतीश नंदाल यांचा पराभव केला.

एकूण आमदारांची मते - ९०

- २ इंडियन नॅशनल लोक दल अनुपस्थित

- ४ काँग्रेस अवैध

- १ भाजप अवैध

एकूण वैध मते - ८३

- मतांचे मूल्य विजयी सूत्र - ८३ एकूण वैध मते X १००/३+१

- जिंकण्यासाठी आवश्यक मत – २७६७

- काँग्रेस कर्मवीर बौद्ध - मत मूल्य - २८००

- भाजपचे संजय भाटिया – मत मूल्य – ३९००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे महापालिकेत नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने 200 ते 250 युवकांची आर्थिक फसवणूक

MLc Election : महायुतीत मोठा भूकंप? भाजप-शिंदेसेनेत ४ जागावरून जुंपली! नक्की काय घडतंय? VIDEO

एकदम टेस्टी! आजच घरी बनवा कच्चा केळीची मसालेदार भाजी, सोपी आहे रेसिपी

NCP Leader Arrested: मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याला पुण्यातून अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Shocking : चिमुकल्या बहिणी खेळता खेळता कारमध्ये गेल्या, दरवाजा बंद केला अन् भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT