Rajya Sabha MP Sudha Murty targeted by cyber criminals, threatened with obscene video allegations. saam tv
देश विदेश

Sudha Murty: खासदार सुधा मूर्ती सायबर गु्न्हेगारांच्या निशाण्यावर; अश्लील व्हिडिओच्या नावे दिली धमकी

Sudha Murty Cyber Crime Case: राज्यसभा खासदार सुधा मूर्ती सायबर फसवणुकीचा बळी ठरल्या. दूरसंचार विभागाचा अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना फोन करून धमकी दिली.

Bharat Jadhav

  • खासदार सुधा मूर्ती यांना अज्ञात व्यक्तीने धमकी दिली.

  • दूरसंचार विभागाचा अधिकारी असल्याचा दावा करून धमकी दिली गेली.

  • मोबाईल नंबरवरून अश्लील व्हिडिओ प्रसारित होईल असं सांगण्यात आलं.

राज्यसभा खासदार आणि सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांना सायबर गु्न्हेगारांनी टार्गेट केलंय. एका अज्ञात व्यक्तीने त्यांना फोन केला. आपण दूरसंचार विभागाचा कर्मचारी असल्याचं सांगितलं. सुधा मूर्ती यांच्या मोबाईल नंबरवरून अश्लील व्हिडिओ ऑनलाइन प्रसारित होत असल्याची धमकी दिली.

संपूर्ण प्रकरण काय होते?

ही घटना ५ सप्टेंबर रोजी घडली होती. जेव्हा सुधा मूर्ती यांना त्यांच्या मोबाईलवर एक कॉल आला. कॉल करणाऱ्याने स्वतःची ओळख दूरसंचार विभागातील अधिकारी म्हणून करून दिली, त्यामुळे सायबर स्कॅम होईल अशी शंका सुधा मूर्तींना आली नाही. त्याने मूर्ती यांना सांगितले की त्यांचा मोबाईल नंबर आधारशी लिंक केलेला नाहीये आणि त्याचा गैरवापर होतोय. हे ऐकताच मूर्ती यांनी ताबडतोब पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. ट्रूकॉलर अ‍ॅपवर कॉलरचा नंबर "दूरसंचार विभाग" म्हणून देखील दिसला, ज्यामुळे प्रकरणाची गंभीरता वाढली.

या कॉल्समध्ये, फसवणूक करणारे सरकारी अधिकारी असल्याचे भासवतात आणि लोकांकडून वैयक्तिक माहिती काढण्याचा प्रयत्न करतात. हा एक सामान्य सायबर घोटाळा आहे जो अनेकदा सामान्य लोकांना आपला शिकार बनवत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT