Action may be taken against the Indian National Congress due to the MLAs who were absent from the Rajya Sabha elections 
देश विदेश

Rajya Sabha Election: काँग्रेसच्या ३ आमदारांवर होणार कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ, काय आहे कारण?

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर बिहारमध्ये राजकीय वातावरण तापलंय. मतदानादरम्यान गैरहजर राहिलेल्या तीन आमदारांवर काँग्रेस कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

राज्यसभेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर बिहारमधील राजकीय वातावरण तापले आहे. मतमोजणीनंतर एनडीएने पाचही जागा जिंकल्या आहेत, यामुळे महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान येथे पाचव्या जागेसाठीची चुरशीची लढत होती, मतदानादरम्यान एनडीएच्या सर्व २०२ आमदारांनी मतदान केले.

दुसरीकडे महाआघाडीतील चार आमदार मतदानावेळी गैरहजर राहिले. यामध्ये काँग्रेसचे तीन आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) एक आमदार होते. हे आमदार गैरहजर राहिल्यामुळे याचा थेट परिणाम निवडणूक निकालांवर झाला. मतमोजणीनंतर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव म्हणाले की, पाचव्या जागेवर फेरमतमोजणी करण्यात आली. तरीही महाआघाडीचे उमेदवार अमरेंद्र धारी सिंह पराभूत झाले. महाआघाडीचे चार आमदार अनुपस्थित राहिल्यानेच निकालावर परिणाम झाल्याचे सांगितलं जात आहे. यासर्व घडामोडी बघता काँग्रेस कठोर पावलं उचलणार आहे.

राज्यसभा निवडणुकीत महाआघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान न करणाऱ्या आमदारांवर कारवाई केली जाणार असल्याचं बिहार प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राजेश राम यांनी सांगितले. या प्रकरणाची सविस्तर अहवाल हा केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवलं जाणार आहे. त्यानंतर कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ram Mandir: तुम्ही जानवे घालता, मांसाहार करता का? राम मंदिराच्या CEO पदाच्या उमेदवारांना विचारले गेले १८ प्रश्न

Maharashtra News Live Update : राज्यसभेत अमित शहांना बोलवा - मल्लिकार्जुन खर्गे

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंविरोधात संजय राऊतांच्या हॉटेलमध्ये बैठका; खासदाराच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

Auto Taxi Marathi Rule : मराठी आलं नाही तर लायसन होणार रद्द! आज येणार शासनाचा मोठा निर्णय; परिवहन मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT