Election Commission announces schedule for Rajya Sabha elections across 10 states in India. saam tv
देश विदेश

26 राज्यसभा जागांसाठी निवडणुकीची घोषणा; वाचा संपूर्ण वेळापत्रक

Rajya Sabha 26 Seats Election Schedule Announced 2026: निवडणूक आयोगाने 10 राज्यांतील 26 राज्यसभा जागांसाठी निवडणूक वेळापत्रक जाहीर केले आहे. 18 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणीही होणार आहे.

Omkar Sonawane

राज्यसभेच्या 26 जागांसाठीच्या निवडणुकीचे बिगूल वाजले असून निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या आहेत. 10 राज्यामधील 26 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 18 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. राज्यसभेतून 21 जून ते 19 जुलै 2026 या कालावधीत वेगवेगळ्या तारखांना विद्यमान खासदारांचा कार्यकाळ संपत असल्याने या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

राज्यसभेतील २४ नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंह बिट्टू यांचा समावेश आहे. त्याशिवाय २ जागांवर पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील सुनेत्रा पवार यांच्या जागेचाही समावेश आहे.

कसे आहे निवडणुकीचे वेळापत्रक?

निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार, 1 जून रोजी अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर 9 जून रोजी अर्ज छाननी केली जाईल, तर 11 जून रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल. त्यानंतर 12 राज्यांतील 2 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT