Uttar Pradesh BJP Candidate List Saam Tv
देश विदेश

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

Uttar Pradesh Rajya Sabha BJP Candidate List: उत्तर प्रदेशमध्ये १६ ऑक्टोबर रोजी राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून आज ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Priya More
  • उत्तर प्रदेश राज्यसभा निवडणुकीसाठी १६ ऑगस्टला निवडणूक

  • भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची केली घोषणा

  • भाजपने उत्तर प्रदेश राज्यसभेसाठी दिग्गजांना दिली संधी

  • भाजपने उमेदवारांची यादी केली जाहीर

भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेश राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची आज घोषणा केली. रविवारी पश्चिम बंगाल आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी एका राज्यसभेच्या जागेवरील उमेदवारांचे नाव भाजपने जाहीर केले होते. त्यानंतर आज उत्तर प्रदेशमधील ८ अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपकडून अनेक जण इच्छुक होते. भाजपने काहींना संधी दिली तर काहींचा पत्ता कट केला. प्रकाश पाल, धर्मपाल सिंह, राम प्रताप सिंह चौहान, विद्यासागर सोनंकर, गोपीकृष्ण पांडे, श्रती गंगवार, प्रियंका सिंह रावत यांना भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

भाजपने उत्तर प्रदेशमध्ये १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या १० जागांच्या राज्यसभा निवडणुकीसाठी आज आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली. भाजप कुणाला संधी देते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर यादी जाहीर झाली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस असणार आहे. भाजपने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. २०२७ च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप या निवडणुकीत जातीय आणि प्रादेशिक घटकांनाही हात घालणार आहे.

भाजपने जाहीर केलेले ८ उमेदवार कोण?

1) धर्मपाल सिंह

2) राधाकांत ओझा

3) प्रकाश पाल

4) विद्यसागर सोनकर

5) गोपी कृष्ण पाण्डेय

6) प्रियंका सिंह रावत

7) राम प्रताप सिंह चौहान

8) श्रुति गंगवार

उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या १० जागा २५ नोव्हेंबर रोजी रिक्त होणार आहेत. यापैकी समाजवादी पक्षाने प्राध्यापक राम गोपाल यादव यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपचे डॉ. दिनेश शर्मा यांनी अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ११ सप्टेंबर रोजी राज्यसभेचा राजीनामा दिला. उत्तर प्रदेशातील भाजपचे नेते अरुण सिंह, गीता शाक्य (उर्फ गीता, चंद्रप्रभा), बी. एम. वर्मा, सीमा द्विवेदी, नीरज शेखर, ब्रिजलाल, डॉ. दिनेश शर्मा आणि हरदीप सिंग पुरी, समाजवादी पक्षाचे प्राध्यापक राम गोपाल यादव आणि बसपाचे रामजी गौतम या राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT