Uttar Pradesh Rajya Sabha Election 2026 BJP, SP Seat Equation AI Image
देश विदेश

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या १० जागांसाठी निवडणुका होणार, भाजपला झटका बसण्याची शक्यता, कसं असेल गणित?

Uttar Pradesh Rajya Sabha Election 2026 Update News : उत्तर प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. भाजप ८ जागा राखण्याच्या स्थितीत असून समाजवादी पक्षाला २ जागांची शक्यता आहे. संपूर्ण संख्याबळाचे गणित जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या १० जागांसाठी १६ ऑक्टोबरला मतदान होणार

  • सध्याच्या संख्याबळानुसार भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी ८ जागा जिंकण्याच्या स्थितीत

  • समाजवादी पक्षाकडे २ जागांसाठी आवश्यक संख्याबळ

  • पश्चिम बंगालमधील एका रिक्त जागेसाठीही निवडणूक होणार

उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या ११ जागांसाठी तसेच एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उत्तर प्रदेशातील १० राज्यसभा जागांसाठी होणारी निवडणूक विशेष महत्त्वाची ठरणार असून, संख्याबळाच्या समीकरणानुसार भाजप ८ जागा कायम राखण्याच्या स्थितीत आहे. समाजवादी पक्षाला २ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर बहुजन समाज पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने त्यांची रिक्त जागा पुन्हा भरणे कठीण आहे. दरम्यान आता भाजप उत्तर प्रदेशातील आपलं वर्चस्व कायम ठेवणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील एकूण १२ राज्यसभा जागांसाठी १६ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना २९ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल, तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर असेल. १६ ऑक्टोबरलाच मतमोजणी केली जाणार आहे.

उत्तर प्रदेशातील दहा जागांपैकी सध्या भाजपकडे ८, समाजवादी पक्षाकडे १ आणि बसपाकडे १ जागा आहे. राज्य विधानसभेतील संख्याबळानुसार एका राज्यसभा जागेसाठी ३७ मतांची आवश्यकता आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे २९४ आमदारांचे संख्याबळ असल्याचे सांगितले जाते. त्यात रघुराज प्रताप सिंह अर्थात राजा भैया यांच्या पक्षाच्या २ आमदारांचाही पाठिंबा महत्त्वाचा ठरतो. या समीकरणामुळे भाजपला ८ जागा जिंकण्यासाठी आवश्यक संख्याबळ उपलब्ध आहे. समाजवादी पक्षाकडेही २ जागांसाठी पुरेसे संख्याबळ असल्याचे चित्र आहे.

उत्तराखंडमध्ये भाजपचे नरेश बन्सल यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने एका जागेसाठी निवडणूक होत आहे. राज्यातील भाजप सरकारच्या बहुमतामुळे ही जागा पक्षाकडेच राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या रुक्मिणी मलिक यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या जागेच्या माध्यमातूनही राज्यसभेतील पक्षीय संख्याबळात बदल होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांमध्ये सर्वाधिक लक्ष उमेदवारांच्या निवडीकडे लागले आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार असल्याने भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : कोर्टाने सांगूनही जंतर-मंतर परिसरातील बॅरिगेट्स पोलिसांनी काढले नाहीत

Weight Loss Food: वजन कमी करण्यासाठी काय खावं, काय टाळावं? आहारतज्ज्ञांचा सल्ला एकदा वाचा

High BP : तुमचा ब्लड प्रेशर नेहमीच वाढलेला असतो? डॉक्टरांनी सांगितलेले ३ सोपे उपाय नक्की करून पाहा

Blue Saree Designs: नवरात्रीनिमित्त महिलांसाठी निळ्या साड्यांचे खास कलेक्शन, 5 सुंदर डिझाईन्स

EPFO Pension : रिटायरमेंटनंतर मिळू शकतात दरमहा 12,500? EPS पेन्शनचे गणित आत्ताच घ्या समजून

SCROLL FOR NEXT