Jammu Kashmir Saam Tv
देश विदेश

Jammu Kashmir Flood : वैष्णो देवीच्या दर्शनला गेले परत आलेच नाहीत, भूस्खलनात ४ उद्योजक भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनाची भीषण दुर्घटना घडली आहे. वैष्णोदेवी मंदिर मार्गावर राजस्थानमधील एकाच कुटुंबातील चार व्यावसायिक भावांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ४१ जणांचा बळी गेला आहे.

Alisha Khedekar

  • जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे वैष्णोदेवी मार्गावर भूस्खलन

  • राजस्थानमधील एकाच कुटुंबातील चार भावांचा मृत्यू

  • आतापर्यंत ४१ जणांचा बळी, अनेक अजूनही बेपत्ता

  • बचावकार्य सुरु, पावसामुळे अडथळे; महामार्ग आणि रेल्वे वाहतूक ठप्प

देशभरात पावसाचे प्रचंड सावट निर्माण झाले असताना जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनाची मोठी दुर्घटना घडली आहे. वैष्णोदेवी मंदिराच्या मार्गावर मंगळवारी दुपारी झालेल्या या भूस्खलनात राजस्थानमधील एकाच कुटुंबातील चार व्यावसायिक भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने मृत तरुणांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील एकाच कुटुंबातील चार भाऊ फिरण्याच्या निमित्ताने वैष्णव देवीच्या दर्शनाला गेले होते. मंगळवारी दुपारी अर्धकुमारी मंदिराजवळ इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ दुपारी ३ वाजताच्या सुमारास भूस्खलन झाले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, काही सेकंदातच डोंगरावरून मोठे दगड कोसळले आणि भाविकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या भूस्खलनात अनेक पर्यटक अडकले यामध्ये या चार भावांचा देखील समावेश आहे. या मृत भावांची नावे अनिल,अरविंद ,गजानंद, संदीप अशी आहेत. हे चौघे भाऊ एकाच घरातले असून व्यापारी आहेत.

या घटनेनंतर स्थानिक पोलिस व एसडीआरफ पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद झाली आहे. अजूनही काही लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या ४८ तासांपासून सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शोध आणि मदतकार्यात अडथळे येत आहेत.

स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जम्मू परिसरात गेल्या २४ तासांत २५० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग अद्याप बंद आहे, तर रेल्वे वाहतूकही मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहण्याचा इशारा दिल्याने स्थानिक प्रशासन सज्ज आहे.

ही घटना केवळ जम्मू-काश्मीरपुरती मर्यादित नसून देशातील इतर राज्यांमध्येही पावसामुळे हाहाकार माजला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक गावे जलमय झाली असून हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची दैना;खरीप पिके जलमय | VIDEO

कृष्णा आंदेकरचा जवळचा शूटर पोलिसांच्या तावडीत; कोमकरच्या हत्येसाठी पुरवली होती पिस्तुल

Mithila Palkar: अभिनेत्री मिथिला पालकरचं समुद्रकिनारी बोल्ड फोटोशूट

Maratha Reservation :...तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, आमच्या लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

एकच नंबर! फक्त ६१ रूपयात १००० चॅनेल, सरकारी कंपनीची भन्नाट ऑफर, वाचा अॅक्टिव्हेशनची प्रोसेस

SCROLL FOR NEXT