Rajsthan Bus Accident News Saam Tv
देश विदेश

Accident News : लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, बस महामार्गावर उलटली; चौघांचा मृत्यू तर ४४ जखमी

Rajsthan Bus Accident News : राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यात लग्नाच्या वऱ्हाडाची बस उलटून झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ४४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Alisha Khedekar

  • लग्नाच्या वऱ्हाडाची बस नियंत्रण सुटल्याने बस उलटली

  • ४ जणांचा मृत्यू, ४४ जण गंभीर जखमी

  • जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

राजस्थानमधील बांसवाडा जिल्हा मुख्यालयापासून २५ किलोमीटर अंतरावर बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ४४ जण गंभीर जखमी झाले आहेत. या बसमध्ये लग्नाचं वऱ्हाड असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर अपघातग्रस्त कुटुंबातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, सज्जनगड पोलीस स्टेशन परिसरातील सांडलाई गावातील शुक्रवारी एका तरुणाचं लग्न झालं. या लग्नानंतर तरुणाची वरात निघाली. त्यानंतर वधु आणि वर एका चारचाकीमधून रवाना झाले. शिवाय उरलेले पाहुणेमंडळी बसमधून घरी जाण्यासाठी रवाना झाले.

संध्याकाळी ६:३० च्या सुमारास लग्नाचं वऱ्हाड परतत असताना बांसवाडा जिल्ह्यातील कालिंजरा पोलीस स्टेशन परिसरातील घोटिया अंबा परिसरात उतारावर अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस उलटली. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ४४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी सांगितले की, जखमींना बांसवाडा येथील महात्मा गांधी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे काहींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी आणि रस्त्याने जाणाऱ्यांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. इंद्रजीत यादव आणि पोलिस अधीक्षक सुधीर जोशी यांनी महात्मा गांधी रुग्णालयात धाव घेतली आणि जखमींवर उपचार करण्याचे निर्देश दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी या ५ वास्तूच्या नियमांचं करा पालन; घरात सतत राहील सुख शांती

T20 world cup prize money: T20 वर्ल्ड कप विजेत्या टीमवर कोटींचा वर्षाव; उपविजेत्यालाही मिळणार मोठी रक्कम

Womens Day स्पेशल बायकोला द्या स्वस्तात मस्त गिफ्ट, वाढेल नात्यातलं प्रेम

Maharashtra Live News Update : इस्रायल- इराण युद्धाचा फटका, हॉटेलमधील जेवण आणि मद्यसेवन महागणार

Women's Day Gifts: वूमन्स डे निमित्त स्वतःला द्या हे ७ खास गिफ्ट्स; दिवस होईल अधिक स्पेशल

SCROLL FOR NEXT