CJI Latest News update Saam tv
देश विदेश

CJI Latest News : सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, बंधू राजेंद्र गवईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

CJI Latest News update : सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न झालाय. त्यावर बंधू राजेंद्र गवई यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

Vishal Gangurde

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न

या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त होत

रिपाईं नेते राजेंद्र गवई यांनी या प्रकाराचा केला निषेध

अमर घटारे, साम टीव्ही

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. बूट फेकणाऱ्या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्यांचे बंधू, रिपाईं नेते राजेंद्र गवई यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

रिपाईं गटाचे नेते राजेंद्र गवई यांनी सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा घटनेचा निषेध नोंदवला. राजेंद्र गवई म्हणाले, मी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. आज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला झालाय. हा भ्याड हल्ला आहे. मानसिकता बिघडलेल्या व्यक्तीने केलेला हा हल्ला वाटतोय. पूर्ण भारतात या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे. परंतु फुले-शाहू-आंबेडकरांच्या अनुयायांना विनंती करतो की, कोणताही अनुचित प्रकार घडायला नको'.

'आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहेत. आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणारे लोक आहोत. आपण संविधानाच्या मार्गावर चालणारे लोक आहोत. त्यामुळे शांतता राखुयात, असेही राजेंद्र गवई यांनी पुढे सांगितले.

शरद पवार काय म्हणाले?

खासदार शरद पवार म्हणाले, 'लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद-प्रतिवादातून न्याय्य भूमिकेकडे जाण्यासाठी न्यायव्यवस्था असते. त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्यन्यायमूर्तींवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणं हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे. आपल्या देशात पेरलं जाणारं विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही, ही देशासाठी धोक्याची घंटा आहे. या घटनेचा मी निषेध करतो आणि कोणत्याही परिस्थितीत भारतीय लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होणार नाहीत, यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देतो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशाच्या ७ राज्यातील विधानसभेच्या ८ जागांसाठी होणार पोटनिवडणुका, जाणून संपूर्ण माहिती

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता जमा झाला की नाही? असं करा स्टेप बाय स्टेप चेक

Swapna Shastra: चांगले दिवस येण्यापूर्वी स्वप्नात दिसू लागतात 'या' गोष्टी

DRDO Recruitment: फ्रेशर्स आहात? DRDO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : - ‘कफ सिरप’च्या उपयोगासंदर्भात भारत सरकारच्या दिशानिर्देशाचे पालन करा - नागपूर महापालिका

SCROLL FOR NEXT