राजस्थान पंचायत समितीचा निकाल हाती येऊ लागले आहेत. या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून जयपूरमधील सत्ताधारी भाजपला काँग्रेसने मोठा धक्का दिला. जयपूरमधील २२ पंचायत समित्यांमधील ९५ प्रभगांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेसने भाजपचा दारूण पराभव केला करत ५१ जागांवर विजय मिळवला. तर भाजपने आतापर्यंत भक्त २१ जागा जिंकल्या आहेत. नागौरचे खासदार हनुमान बेनिवाल यांच्या पक्षाने आरएलपीने १८ जागा जिंकल्या आहेत, तर इतर उमेदवारांनी ५ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जयपूर जिल्ह्यातील २२ पंचायत समित्यांच्या ९५ प्रभागांच्या निकालांमध्ये काँग्रेसने भाजपवर ३० जागांची आघाडी घेतली आहे. चौमुन पंचायत समितीत भाजपने ३ जागा आणि काँग्रेसने १ जागा जिंकली आहे. गोविंदगड पंचायत समितीत काँग्रेसने १ जागा आणि आरएलपीने ३ जागा जिंकल्या आहेत. झोटवारा पंचायत समितीत भाजपने ३ जागा आणि काँग्रेसने १ जागा जिंकली आहे. जोबनेर पंचायत समितीत भाजपने १ जागा, काँग्रेसने ३ जागा, तर आरएलपी आणि इतरांनी प्रत्येकी १ जागा जिंकली आहे. किशनगड रेनवाल पंचायत समितीत काँग्रेसने ४ जागा जिंकल्या आहेत.
मौजमाबाद पंचायत समितीमध्ये भाजपने १ जागा आणि काँग्रेसने ३ जागा जिंकल्या. सांबर पंचायत समितीमध्ये भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी २ जागा जिंकल्या आहे. अमरसर पंचायत समितीमध्ये काँग्रेस आणि आरएलपीने प्रत्येकी २ जागा जिंकल्या. आमेर पंचायत समितीमध्ये भाजपने १ जागा, काँग्रेसने ३, तर आरएलपी आणि इतरांनी प्रत्येकी १ जागा जिंकली आहे. जलसू पंचायत समितीमध्ये भाजप, काँग्रेस, आरएलपी आणि इतरांनी प्रत्येकी १ जागा जिंकली आहे. रामपुरा दाबडी पंचायत समितीमध्ये आतापर्यंत भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी १ जागा जिंकली आहे. शाहपुरा पंचायत समितीमध्ये काँग्रेसने ३ जागा आणि इतरांनी १ जागा जिंकली आहे.
दरम्यान, राजस्थानमधील पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. ४१९ पैकी २०१ पंचायत समित्यांचे कल जाहीर झाले आहेत. १०२ पंचायत समित्यांमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे तर ७१ समित्यांमध्ये भाजप आघाडीवर आहे. उर्वरित २८ मतदारसंघांमध्ये अपक्ष आणि इतर आघाडीवर आहेत. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.