Jain Sadhvi
Jain Sadhvi Saam Tv
देश विदेश

Rajasthan News: 11 वर्षांच्या मुलीसोबत आईसुद्धा बनली साध्वी, सरकारी नोकरी सोडत घेतला मोठा निर्णय

Priya More

गुजरातमधील (Gujarat) प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाने आपली ३०० कोटींची संपत्ती दान करत पत्नीसोबत भिक्षुक बनण्याचा निर्णय घेतला. सध्या या बांधकाम व्यवसायिकाची सगळीकडे चर्चा होत आहे. अशामध्ये आता राजस्थानमध्ये (Rajasthan) एका सरकारी शाळेच्या शिक्षिकेने आपल्या ११ वर्षांच्या मुलीसोबत जैन साध्वी बनण्याचा निर्णय घेतला. महत्वाचे म्हणजे या शिक्षिकेची ११ वर्षांची मुलगी ही सर्वात कमी वयामध्ये दीक्षा घेणारी साध्वी असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यातील छोटीसाद्री येथील एका सरकारी शाळेमध्ये शिक्षिकेची नोकरी करणाऱ्या महिलेने आपल्या आयुष्यामध्ये मोठा निर्णय घेतला आहे. या महिलेने सरकारी नोकरी सोडून जैन साध्वी बनण्याचा निर्णय घेतला आहे. प्रीती असे या महिलेचे नाव आहे. ४० वर्षांच्या प्रितीसोबत तिची ११ वर्षांची मुलगी देखील जैन साध्वी बनणार आहे.

प्रितीची मुलगी सारा अवघ्या ११ वर्षांची आहे आणि ती आता एका जैन साध्वीचे आयुष्य जगणार आहे. साराही तिची आई प्रितीसोबत २१ एप्रिलला जैन साध्वीची दीक्षा घेणार आहे. यासह सारा दीक्षा घेणारी सर्वात कमी वयाची संन्यासी ठरणार आहे. प्रितीने जेव्हा पहिल्यांदा तिच्या घरच्यांना दीक्षा घेण्याची इच्छा सांगितली तेव्हा सर्वांनी तिला लहान वयाचे कारण देत दीक्षा घेण्यापासून रोखले. पण प्रितीने या अवघड वाटेवर चालण्याचा निर्णय घेतला. ती आपल्या निर्णयावर ठाम होती. आईसोबत मुलगीसुद्धा साध्वी बनणार आहे. सारानेही संयमाच्या मार्गाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

21 एप्रिल रोजी जैन श्री संघाच्या संतांच्या उपस्थितीत प्रिती बेन आणि सारा यांना दीक्षा दिली जाणार आहे. दीक्षा समारंभानंतर दोघेही साध्वीप्रमाणे आपले गुरु सौम्यरत्न श्रीजी आणि पुनितरसा श्रीजी यांच्यासोबत एका साध्वीप्रमाणे प्रस्थान करतील म्हणजेच एका शहरातून दुसऱ्या शहरात जातील. त्यांच्या दीक्षाग्रहणाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

दीक्षा म्हणजे भिक्षुक जगापासून अलिप्त होऊन संयमाच्या मार्गावर चालतात आणि मोक्षमार्गावर पुढे जातात. मोक्षप्राप्तीच्या दिशेने दिशाहीन जीवन घेणे हे आहे. जैन भिक्षुकांचे जीवन खूप कठीण असते. ते पायात बूट किंवा चप्पल घालत नाहीत आणि बेडवर झोपत नाहीत. ते अन्नासाठी भिक्षा मागतात, जमिनीवर झोपतात आणि अनवाणी प्रवास करतात. त्यांना लोभ, आसक्ती, माया इत्यादींचा त्याग करून संयमाचा मार्ग स्वीकारावा लागतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Attack : वाघाच्या हल्यात इसमाचा मृत्यू; तेंदूपत्ता संकलनासाठी गेला असतानाची घटना

Hina Khan: हिना खानचा सिंपल आणि सोबर लूक पाहिलात का?

Arjun Tendulkar: IPL नंतर अर्जुन तेंडुलकर देवदर्शनाला! कोल्हापूरच्या नृसिंहवाडीतील दत्त महाराजांचं घेतलं दर्शन -Video

Aishwarya Rai And Aaradhya Bachchan : आईसोबत जगभर फिरते, मग आराध्या शाळेत केव्हा जाते ? ट्रोलर्सच्या प्रश्नावर ऐश्वर्या रायचं खणखणीत उत्तर

Pulses inflation : महंगाई डायन ...ऑक्टोबरपर्यंत डाळींचे भाव कमी होणार नाहीत, मोठं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT