Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्यासाठी घरून येणाऱ्या डब्यात नेमकं काय असतं? ED च्या खळबळजनक दाव्यानंतर HC ने मागवला डाएट चार्ट

Arvind Kejriwal News : मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल संध्या तिहार कारागृहामध्ये आहेत. दरम्यान सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) उच्च न्यायालयात एक खळबळजनक दावा केला आहे.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Saam Digital

मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल संध्या तिहार कारागृहामध्ये आहेत. दरम्यान सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) उच्च न्यायालयात एक खळबळजनक दावा केला आहे. अरविंद केजरीवाल यांना मधुमेह असतानाही ते जाणीवपूर्वक गोड पदार्थ खात आहेत. त्यामुळे वैद्यकीय कारण पुढे करून ते जामीन मागू शकतात असा दाव ईडीने केला आहे. ED च्या दाव्यानंतर कोर्टाने तिहार जेल प्रशासनाकडून केजरीवाल यांचा डाएट चार्ट मागवला आहे.

अरविंद केजरीवाल यांना मधुमेह असल्याने त्यांनी गोड खाऊ नये हे सांगितलेलं आहे. मात्र केजरीवाल यांना त्यांच्या घरून डबा येतो त्यात आंबे, मिठाई असते. हे गोड पदार्थ खाल्ल्यामुळे मधुमेह वाढू शकतो. याचा फायदा घेऊन ते मेडिकलचं कारण देऊन जामीन मागू शकतात, असा दावा ईडीने केला आहे.

१२० शुगर लेवल नॉर्मल मानली जाते, मात्र अरविंद केजरीवाल यांच्या साखरेची पातळी २४३ पर्यंत पोहोचली आहे, हे प्रमाण खूपच आहे. अरविंद केजरीवाल यांना डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेनुसारच जेवण दिलं जात आहे, असं केजरीवाल यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. त्यावर कोर्टाने त्यांचा डाएट चार्ट मागीतला आहे.

Arvind Kejriwal
Delhi Liquor Policy: 'आप' च्या अडचणी काही मिटेना! मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत २६ एप्रिलपर्यंत वाढ

न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या वकिलाला सांगितले की, तिहार तुरुंगातून प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे. तुम्ही न्यायालयाला डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शनही द्या. त्याचवेळी ईडीने कोर्टात जेलच्या डीजींकडून अहवाल मागू शकता, असं म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून दाखल केलेली याचिका मागे घेण्यात आली आहे. आता सुधारित याचिका दाखल केली जाणार आहे. आता या प्रकरणाची सुनावणी उद्या म्हणजेच शुक्रवारी दुपारी २ वाजता होणार आहे.

Arvind Kejriwal
India Population: भारताची लोकसंख्या १४४ कोटी; चीनलाही मागे टाकले, अहवालातून आकडेवारी समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com