Rajasthan Brother And Sister Death Saamtv
देश विदेश

Rajasthan News: कुत्रा मागे लागल्याने पळाले, बहिण- भाऊ धावत रेल्वे रुळावर पोहोचले अन्.. काळीज पिळवटून टाकणारी घटना

Rajasthan Brother And Sister Death: दुपारी शाळा सुटल्यानंतर अनन्या आणि युवराज हे दोघे बहिण- भाऊ घराकडे चालले होते. यावेळी काही कुत्रे त्यांच्या मागे लागली. कुत्रे जोरात भुंकू लागल्याने दोन्ही मुले जीव मुठीत घेऊन पळत सुटली.

Gangappa Pujari

Rajasthan News:

रस्त्यावर मोकाट फिरवणाऱ्या जनावरांमुळे अनेक अपघात झाल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राजस्थानमधून अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये कुत्र्यामुळे बहिण- भावाला जीव गमवावा लागलाय. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ही दुर्दैवी घटना जोधपूरच्या (Jodhpur) माता का थान विभागात घडली. दुपारी शाळा सुटल्यानंतर अनन्या आणि युवराज हे दोघे बहिण- भाऊ घराकडे चालले होते. यावेळी काही कुत्रे त्यांच्या मागे लागली. कुत्रे जोरात भुंकू लागल्याने दोन्ही मुले जीव मुठीत घेऊन पळत सुटली. पळता पळता दोन्ही मुले जवळच असलेल्या रेल्वे रुळापर्यंत पोहोचली.

याचवेळी एक भरधाव ट्रेन जात होती. या ट्रेनखाली चिरडल्याने दोन्ही चिमुकल्यांचा करुण अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह नातेवाईकांनी धाव घेतली. यावेळी मुलांच्या आई- वडिलांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. मृत मुलगी अनन्या ही तिसरीत शिकत होती तर भाऊ युवराज सिंह हा पाचव्या इयत्तेत शिकत होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत कुत्र्याच्या मालकावर कारवाईची मागणी केली. नगर पालिकेने कुत्र्यांना पकडल्यानंतरच नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. नातेवाईकांच्या तक्रारीवरुन पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असल्याची माहिती जोधपूरचे एडीसीपी नजीम अली यांनी माध्यमांना दिली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT