बांसवाडा जिल्ह्यात असलेल्या सरवन गावामधील रहिवाशी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडलीय. राजस्थानमधील प्रस्तावित माही अणुऊर्जा प्रकल्पावरुन रहिवाशी आणि पोलीस भिडलेत. प्रकल्पासाठी बांधण्यात येणाऱ्या सीमा भिंतीवरून सरवन गावातील रहिवाशी आणि पोलिसांची हाणामारी झाली. या हाणामारीत सुमारे ३ तास चाललेल्या या वादात ३ पोलीस कर्मचारी आणि अनेक ग्रामस्थ जखमी झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी २,८०० मेगावॅटच्या प्रकल्पाची पायाभरणी लवकरच करतील, अशी अपेक्षा आहे.
भारत आदिवासी पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांसह १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रकल्प होत असल्याने नागरिकांनी स्थलांतरला विरोध केलाय. स्थलांतराच्या विरोधात रहिवाशांनी पोलिसांवर दगडफेक केली. सरकार-अधिग्रहित जमीन रिकामी करण्यासाठी आणि न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इन डिया लिमिटेड (NPCIL) द्वारे सीमा भिंत बांधण्यात येत असताना पोलीस कर्मचारी तेथे उपस्थित होते.
प्रकल्पाला विरोध का होतोय
मागण्या पूर्ण होईपर्यंत स्थानिक स्थलांतर करण्यास तयार नसल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी आग्रवाल म्हणाले काही लोक, ज्यांची जमीन प्रस्तावित प्रकल्पासासाठी संपादित करण्यात आलीय. या लोकांना पर्यायी भूखंड देण्यात आले आहेत,तरीही ते विरोध करत आहेत,” असं अग्रवाल म्हणाले. प्रकल्पासाठी ५५३ हेक्टर जमीन संपादित करण्यासाठी सरकारने ४१५ कोटी रुपयांची भरपाई दिलीय. विस्थापित गावकऱ्यांसाठी घरे बांधण्यासाठी जवळील खारिया देव येथे ६० हेक्टर जमिनीचा भूखंड देखील देण्यात आलाय.
मात्र, रुग्णालयाच्या स्थापनेसह त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत स्थानिक लोक स्थलांतर करण्यास तयार नाहीत. जुलै महिन्यात हजारो आदिवासी लोक त्यांच्या समस्या मांडण्यासाठी आणि प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यासाठी बांसवाडा येथील मानगड धाम येथे जमले होते. आपल्या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवरही बहिष्कार घातला होता.
या प्रकल्पासाठी ६ गावातील सुमारे ३००० हजार नागरिकांचं स्थलांतर केलं जाणार आहे. यात बारी, सजवानिया, रेल, खारिया देव, आदिभीत आणि कटुंबी गावाचा समावेश आहे. काही आंदोलक नागरीक जवळच्या टेकडीवर गेले आणि त्यांनी दगडफेक केली. आंदोलकांच्या दगडफेकीला प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि राष्ट्रीय महामार्ग ९२७-ए मध्ये अडथळा आणणाऱ्या महिलांच्या गटाला पांगवलं.
घडलेल्या हिंसाचारासंदर्भात बांसवाराचे एसपी हर्षवर्धन अग्रवाल म्हणाले, छोटी सरवन येथील केंद्र सरकारच्या प्रकल्पाच्या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या गोळ्या झाडण्यात आल्या. क्विक रिस्पॉन्स टीमचे (क्यूआरटी) जवान कल्पेश गरसिया यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना बांसवाडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.