धक्कादायक! सासूने ५ लाखांची सुपारी देऊन केली जावयाची हत्या Saam Tv
देश विदेश

धक्कादायक! सासूने ५ लाखांची सुपारी देऊन केली जावयाची हत्या

राजस्थान मधील जोधपूर या ठिकाणी एका सासूने आपल्या जावयाची हत्या केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजस्थान : राजस्थान Rajasthan मधील जोधपूर Jodhpur या ठिकाणी एका सासूने आपल्या जावयाची हत्या Murder केली आहे. जावयाच्या हत्या करण्यासाठी सासूने ५ लाख रूपयांची सुपारी दिली होती. हत्येच्या या कटामध्ये सासूने तिच्या शेजाऱ्यांना सामिल करून घेतले आहे. या प्रकरणाची माहिती जोधपूर पोलिसांनी Police सांगितले की, आरोपी सासूसोबत इतर २ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जोधपूर येथील सुरपुरा Surpura बांध रोडवर १ ऑगस्ट दिवशी एका प्लास्टिकच्या पोत्यात १ मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी त्या मृतदेहा बाबत तपास सुरू केला होता. तेव्हा मृत व्यक्तीचे नाव विनोद असल्याचे समजले आहे. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, विनोदहा ३१ जुलै दिवशी सासरी आली होता. तो त्याच्या सासूला भेटल्यानंतर जरा घरामधून बाहेर पडला होता.

हे देखील पहा-

तेव्हा सासूच्या झालेल्या प्लॅननुसार जब्बर सिंह आणि धनराज यांनी त्याचा पाठलाग करायला सुरवात केली. ते त्याला एका अज्ञात ठिकाणी नेण्यात आले होते. तिथे त्यांनी त्याची हत्या केली आणि मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात टाकून त्याला लांब फेकून दिले. याप्रकरणात एडीसीपी यांनी सांगितले की, विनोदने मदेरणा कॉलनी मधील तरूणीसोबत ४ वर्षाअगोदर लव्ह मॅरेज केले होते. तो मजुरी करत होता.

ज्यामुळे त्याचा सासूसोबत नेहमी वाद होत होता. नुकतीच त्याची पत्नी माहेरी आलेली होती. हत्येच्या दिवशीही त्याचे मोबाइल लोकेशन मदरेणा कॉलनी या ठिकाणी दिसत होते. त्याच्या शेवटच्या मोबाइल लोकेशनच्या आधारावर पोलिसांनी पुढील तपासाला सुरूवात केली. साध्या कपड्यांमध्ये पोलीस त्याठिकाणी तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी हत्येच्या दिवशी सीसीटीव्हीचे फुटेज चेक केले असता.

त्यामध्ये विनोद एक सासरी जाताना दिसला होता. यानंतर पोलिसांनी त्याची सासू ग्यारसी देवीची कसून चौकशीला सुरवात केली असता. आधी तर आरोपी सासूने पोलिसांना उडवा- उडवीची उत्तरे दिली. पण नंतर पोलिसांनी हिसका दाखवला, त्यावेळेस तिने गुन्हा मान्य केला आहे. आरोपी सासूने पोलिसांना सांगितले की, तिने शेजारी जब्बर सिंह आणि धनराज पुरीच्या मदतीने जावई विनोदची हत्या करण्यासाठी ५ लाख रूपयांची सुपारी देण्यात आली होती.

पोलिसांनी जब्बर सिंह आणि धनराजची चौकशी केली तर त्यांनी देखील हा गुन्हा मान्य केले आहे की, विनोदच्या सासूच्या सांगण्यावर विनोदची हत्या केली आहे. पुढे त्याचा मृतदेह फेकून दिले. आरोपींनी सांगितले की, ग्यारसी देवीला जावयाचे राहणीमान, त्याची वागणूक आवडत नव्हती. यामुळे तिने जावयाची हत्या केली आहे. पोलिसांनी सांगितले की, विनोद ३१ जुलै दिवशी सासरी आली होता.

तो त्याच्या सासूला भेटल्यानंतर जरा घरामधून बाहेर पडला होता. तेव्हा प्लॅननुसार जब्बर सिंह आणि धनराजने त्याचा पाठलाग केला असता. ते त्याला एका अज्ञात ठिकाणी घेऊन गेले होते. तिथे त्यांनी त्याची हत्या केली आणि मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून फेकले आहे. पोलिसांनी सांगितले की, सासू ग्यारसीच्या पतीचे काही वर्षाअगोदर निधन झाले होते. पतीचे पेंशन आणि इतर संपत्ती मिळून, ती घर चालवत असत. सासूसोबत पोलिसांनी शेजाऱ्यांनाही अटक केलेली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पतीशी भांडण, पोलिसाशी अफेअर, शरीरसंबंध अन् हत्या; आरोपीचा खरा चेहरा 'असा' समोर आला

Palak Pakoda Recipe: थंडीत संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा स्ट्रीट स्टाईल पालक भजी, ही आहे सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: शितल तेजवानीची पुणे पोलिस आयुक्तलयात EOWकडून चौकशी

Karan Johar: 'देवा, मला एक जोडीदार...'; ५३ वर्षीय करण जोहर शोधतोय पार्टनर, अचानक काय झालं? स्वत:च सांगितलं कारण

Maharashtra Politics : ऐन निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का; सलील देशमुख यांचा पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT