Viral News AI Photo
देश विदेश

Viral News: नवरा बायको दारू पिऊन तर्राट, चकना दिला नाही म्हणून पत्नीने रस्त्यावरच नवऱ्याला धोपटलं

Drunk wife slaps husband News: पती पत्नी दोघांनीही मद्यपान केलं. त्यानंतर दोघेही तर्राट झाले. पत्नीनं दारूच्या नशेत चकना मागीतला, पतीनं चकना दिला नाही म्हणून भररस्त्यात कानशि‍लात लगावली.

Bhagyashree Kamble

अनेकदा दारू प्यायल्यानंतर माणूस भान हरपतो. आपण कुठे आणि काय बोलत आहोत, याची कल्पना नसते. अनेकदा दारू पिऊन लोक गोंधळ घालतात. पण कधी महिलेला भररस्त्यात गोंधळ घातलेलं आपण पाहिलंय का? राजस्थानमधून अशीच एक घटना समोर येत आहे.

पती आणि पत्नी दोघांनी दारू पार्टी केली. नंतर दोघे पायी जात असताना रस्त्यावर बसले. पत्नीनं चकन्याची मागणी केली. पतीनं चकना आणला नाही. हाच राग मनात धरून पत्नीनं पतीला कानशिलात लगावली. हा सगळा तमाशा लोक पाहत होते.

नेमकं घडलं काय?

सिरोहीमधील एक जोडपं दारूच्या नशेत काय करत होतं, हे त्यांना त्यांचं कळत नव्हतं. पती पत्नी आधी एकत्र दारू पार्टी करायला गेले. दोघांनीही मद्यपान केलं. दारू पिऊन पती पत्नी दोघेही पायी जात असताना रस्त्यावर बसले. बायकोनं नवऱ्याकडे चकन्याची मागणी केली. तेव्हा पतीनं चकना आणून देण्यास नकार दिला.

चकन्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर पत्नीनं पतीला भररस्त्यात मारहाण केली. नंतर रागाच्या भरात पत्नीनं पतीच्या कानशिलात लगावली. रस्त्यावरून जाणारे लोक हा सगळा तमाशा पाहत होते. परंतू नशेमध्ये असल्यामुळे दोघांना याचं भान नव्हतं.

दोघांनी मद्यपान केलं होतं, आपण रस्त्यावर काय करत आहोत, याची कल्पना त्या जोडप्याला नव्हती. दोघं शांत झाल्यानंतर रस्त्यावरून उठून आपल्या घरी गेले. या घटनेनंतर परिसरातील लोकांनी जोडप्यांनी केलेल्या कृत्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT