Crime News Saam TV
देश विदेश

Crime News : १५ वर्षीय विद्यार्थीनीचं शाळेतून अपहरण; जंगलात नेऊन सामूहिक बलात्कार, काळीमा फासणारी घटना

एका १५ वर्षीय मुलीचे शाळेच्या परिसरातून अपहरण करत पाच तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला आहे.

Satish Daud

Rajasthan Crime News : देशात महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अल्पवयीन मुलींवरही अत्याचार केल्याच्या घटना समोर येत आहे. महिला अत्याचारांविरोधात कडक पाऊले उचलण्याची मागणी होत असतानाच राजस्थानमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय मुलीचे शाळेच्या परिसरातून अपहरण करत पाच तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला आहे. (Latest Marathi News)

याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा (Crime News) दाखल केला असून आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. गणेश हरिजन, कालू दरोगा, आदिल खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात ही संतापजनक घटना घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार, चुरूच्या रतनगड पोलीस स्टेशन परिसरात पाच तरुणांनी नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे शाळेच्या परिसरातून अपहरण केले. त्यानंतर तिला दूर जंगलात नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपींनी पळ काढला. पीडित मुलगी बेशुद्ध अवस्थेत नातेवाईकांना आढळून आली. पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. इतरांचा शोध सुरू आहे.

पीडितेच्या काकांनी रतनगड पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित विद्यार्थीनी नववीत शिकते. 23 डिसेंबरला ती नेहमीप्रमाणे घरातून सकाळी 9 वाजता शाळेत गेली. शाळा अर्धी संपली असताना दीडच्या सुमारास त्यांच्या मोठ्या भावाचा मुलगा धावत आला. त्याने सांगितले की काही तरुणांनी त्याच्या बहिणीचे अपहरण केले असून ते तिला जंगलात घेऊन गेले आहेत.

मुलीच्या अपहरणाची माहिती मिळताच नातेवाईकांनी थेट जंगलाच्या दिशेने धाव घेतली. जेव्हा पीडितेचे काका जंगलात गेले, त्यांना एका झाडाखाली काही तरुण पीडितेवर सामूहिक बलात्कार करताना दिसून आले. पीडितेच्या काकाला बघताच, या तरुणांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेच्या काकांनी तीन आरोपींना पकडले. तर दोन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT