Crime  Saam tv
देश विदेश

Crime : हव्यासासाठी पत्नी झाली नवऱ्याची वैरी, बॉयफ्रेंड सोबत मिळून केलं कांड

Husband Wife crime News : पती, पत्नी और गँगस्टर.. हा चित्रपट तुम्हाला आठवतोय का? तशीच काहीशी घटना समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

Husband Wife Relationship : शरिरसुखासाठी, हव्यासासाठी पत्नीने प्रियकरासोबत मिळून नवऱ्याला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमधील चित्तोडगढमध्ये पत्नीने ब्रॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करत पत्नी, तिचा बॉयफ्रेंड आणि इतर साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक वृत्तमानपत्राच्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव रीना बंजारा असे आहे. पोलिसांच्या तपासात नवऱ्याच्या हत्येप्रकऱणात दोषी असल्याचं आढळून आलेय.

मिळालेल्या माहितीनुसार, रीना आणि दिनेश बंजारा यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सूत जुळाले होते. कायमचे एक होण्यासाठी त्यांनी रीनाच्या नवऱ्याला संपवण्याचा डाव आकला. त्यासाठी त्यांनी बद्रीलाल याची मदत घेतली. तिघांनी मिळून रीनाचा पती ढगनलाल याचा खून केला. पोलिसांनी याप्रकऱणाचा तपास लावत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मंगलवाड पोलीस याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

नवऱ्याच्या खूनाची मास्टरमाइंड निघाली पत्नी

येथील पोलीस अधीक्षक सुधीर जोशी यांना मंगलवाड जवळ रस्त्यावर एक मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थानर धाव घेतली. त्याची ओळख भीलाखेडा येथील छगनलाल गोरु बंजारा असी निघाली. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबियांना बोलवत पुढील प्रोसेस सुरु केली. मृतकच्या वडिलांनी मुलाच्या हत्येप्रकरणी पोलीस तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये त्याने रीना आणि तिच्या प्रियकराचा उल्लेख केला होता. पोलिसांनी तात्काळ दोघांनाही अटक केली. पोलिसांनी आरोपींना खाकी दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला.

पती, पत्नी और ओ

रीनाने प्रियकर दिनेश आणि त्याचा साथीदार बद्रीलाल याच्यासोबत मिळून छगनलालची हत्या करण्याचा प्लॅन आखल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आलेय. प्रेमसंबंधात छगनलाल अडथळा ठरत अशल्याचा आरोप रीनाने प्रियकर दिनेश याच्याकडे केला होता. या कारणावरून बद्रीलालने छगनलालला दारू देण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले. त्यानंतर गळ्यातील गमछ्याने दिनेश आणि बद्रीलालने गळा आवळून त्याला संपवले.

हत्या केल्यानंतर या घटनेला अपघात झाल्याचे भासविण्यासाठी आरोपींनी मृतदेह मंगळवेढा-निंबाहेरा महामार्गावर टाकून दिला होता. पोलिसांनी या हत्याकांडातील सर्व आरोपींना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT