Raj Thackeray
Raj Thackeray Saam Tv
देश विदेश

राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही; भाजप नेत्याचा इशारा

साम वृत्तसंथा

लखनौ: मागिल काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यावरुन राज्य सरकारला इशारा दिला आहे. भोंगे उतरले नाहीतर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेला भाजपनेही पाठिंबा दिला आहे. राज ठाकरेंनी ५ जून रोजी मनसैनिकांसोबत अयोध्येत जाणार असल्याचे जाहीर केले आहे. याच मुद्द्यावरुन उत्तर प्रदेशचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप खासदारानेच राज ठाकरेंना अयोध्येत येण्यावरुन इशारा दिला आहे. महाराष्ट्रात एकिकडे भाजपचा (BJP) मनसेला पाठिंबा तर उत्तर प्रदेशमध्ये विरोध असल्याचे दिसत आहे.

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यांनी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागितल्यानंतरच राज ठाकरेंना अयोध्येत प्रवेश दिला जाईल, असंही ते म्हणाले आहेत.

बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं उत्तर भारतीयांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. खास करुन मनसेने उत्तर प्रदेशातील लोकांचा विरोध केला होता. त्यावेळीपासून राज ठाकरे उत्तर भारतात चांगलेच चर्चेत होते. काही दिवसांपासून ठाकरे यांनी भूमिका बदलली आहे. यावरुनच बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

'राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा हात जोडून माफी मागितली पाहिजे. आता त्यांना अयोध्येची आठवण आली आहे. अयोध्येच्या आंदोलनात ठाकरे परिवाराचे काही देणघेणं नाही. त्यांनी माफी मागितल्याशिवाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांनी कोणताच संपर्क ठेवू नये, असंही खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे.

भोंग्याविरोधात आंदोलन सुरुच राहणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज्य सरकारला भोंग्या संबंधी इशारा दिला होता. ४ मेपर्यंत भोंगे उतरले नाहीतर भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचा इशारा दिला होता. औरंगाबादमध्येही सभा घेऊन ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला होता. ४ मे रोजी राज्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं होतं. राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात आंदोलन सुरुचं राहणार असल्याचे सांगितले आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI Vs LSG : लखनौच्या गोलंदाजांसमोर मुंबईचा संघ गडगडला; लखनौसमोर १४५ धावांचं लक्ष्य

Modi VS Pawar | राजकारणातील भटकती आत्मा कोण? मोदी-पवारांमध्ये जुंपली

Today's Marathi News Live : ठाण्याच्या जागेचा मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य, प्रताप सरनाईक

Arvind Kejriwal: निवडणुकीपूर्वी केजरीवालांना अटक का? कोर्टाने ईडीला विचारले हे 5 प्रश्न

Pratibha Patil: माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील घरातूनच करणार मतदान, मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण होणार

SCROLL FOR NEXT